Close

लग्नापूर्वी परिणिती आणि राघव चड्ढा झालेत देवाच्या भक्तीत तल्लीन, घेतले उज्जैनच्या महाकालेश्वरचे दर्शन (Parineeti Chopra and Raghav Chadha visit Mahakaleshwar Temple)

परिणीती चोप्रा तिच्या लग्नामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ती बर्‍याचदा तिच्या होणार्‍या नवऱ्यासोबत दिसते. दोघांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. आता लग्नाच्या एक महिना आधी, परिणीती तिचा होणारा नवरा राघव चड्ढासोबत उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरच्या दरबारात पोहोचली, ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

श्रावणासारख्या पवित्र महिन्यात, परिणिती चोप्रा आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा महाकालच्या दरबारात पोहोचले, जिथे त्यांनी नंदी हॉलमधून महाकालेश्वराची पूजा केली.

बाबा महाकालच्या भस्म आरतीतही हे जोडपे सहभागी झाले होते. या जोडप्याने 30 मिनिटे शांतीपाठाची पूजा केली. यावेळी दोघेही महाकालाच्या भक्तीत मग्न झाले होते.

दोघेही महाकाल मंदिरात अतिशय पारंपरिक लूकमध्ये दिसले. यावेळी राघवने धोतर-सोहळ परिधान केलेले दिसत होता, तर परिणीती गुलाबी रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसत होती. दोघेही एकत्र एका परफेक्ट कपलसारखे दिसत होते. जवळपास 1 तासभर ते मंदिरात होते. मंदिरातून बाहेर आल्यानंतर दोघेही मीडियाशी बोलले नाहीत. राघव चढ्ढा ‘जय महाकाल’ असा जयघोष करत तेथून निघून गेले.

मंदिर परिसरातून या जोडप्याचा एक व्हिडिओही समोर येत आहे, ज्यामध्ये पुजारी मंत्रोच्चार करताना त्यांच्या कपाळावर टिळक लावताना दिसत आहेत. दोघांचे सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे 25 सप्टेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. हे लग्न राजस्थानमध्ये पंजाबी रितीरिवाजांनी होणार आहे. यानंतर दोघेही दिल्लीत ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत. या वर्षी 13 मे रोजी दोघांनी दिल्लीत एंगेजमेंट केली होती.

Share this article