बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. हे जोडपे २५ सप्टेंबरला राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे. चाहते त्यांच्या लग्नाच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत होते आता ही तारीख समोर आल्यामुळे त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.
परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्डा यांचा याच वर्षी दिल्लीत साखरपुडा झाला. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, एंगेजमेंटनंतर आता लव्हबर्डच्या लग्नाची तारीख आणि ठिकाणही फायनल झाले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा 25 सप्टेंबरला राजस्थानमध्ये एका भव्य विवाहसोहळ्यात विवाहबंधनात अडकणार आहेत.
मात्र, आतापर्यंत ना परिणीती चोप्राने लग्नाच्या तारखेबद्दल काही सांगितले ना राघव चढ्ढा यांनी याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिले. लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीयच हजर राहणार असल्याचेही वृत्त आहे. परिणीतीच्या टीमने अभिनेत्रीच्या लग्नाची सर्व तयारी सुरू केली असून अभिनेत्रीही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून तिच्या लग्नाची तयारी सुरू करणार आहे.
दोघांच्या लग्नाचे विधी जवळपास एक आठवडा अगोदर सुरू होतील, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लग्नानंतर गुरुग्राममध्ये रिसेप्शन होणार आहे.
काही दिवसांपूर्वी परिणीती आणि राघव यांनी राजस्थानमधील उदयपूर पर्यटन विभागाच्या उपसंचालकांची भेट घेऊन तेथील हॉटेल्सची माहिती घेतली.