परिणीती चोप्राने 24 सप्टेंबर रोजी राजकीय नेते राघव चड्ढाशी विवाह केला. त्यांच्या स्वप्नवत लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, नवविवाहित वधू परिणीतीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये परिणीतीचे तिच्या नवीन घरात स्वागत होत आहे. घरातले तिला अगदी राणीसारखे वागवत आहेत.
लग्नानंतर नवऱ्याच्या नावाची मेहंदी, कपाळावर सिंदूर, पायात आल्टा आणि गळ्यात मंगळसूत्र घालून परिणिती तिच्या सासरच्या घरी पोहोचली तेव्हा राघव चढ्ढा यांच्या घरी तिचे भव्य स्वागत करण्यात आले.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये परिणिती तिच्या सासरच्या घरी पोहोचताच ढोल-ताशांच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले. यावेळी परिणीती ढोलाच्या तालावर आनंदाने नाचतानाही दिसली
या गृहप्रवेशाच्या समारंभात, तिच्या सासूने तिची ओवाळणी केली तर यानंतर नवविवाहित वधू परिणीतीने भिंतीवर कुंकवाचे ठसे लावले. त्यानंतर माप ओलांडत तिने चड्ढा घरात गृहप्रवेश केला.
यावेळी परिणीतीने तिच्या सासरच्या घरी खूप धमाल केली आणि लग्नानंतर खेळल्या जाणाऱ्या खेळाचा विधीही ती पार पाडताना दिसली. विधीदरम्यानच परिणीती चोप्राने सांगितले की, तिनेच पहिल्यांदा राघव चड्ढाला आय लव्ह यू म्हटले होते.
ती तिच्या सासरच्या घरी पोहोचताच, परिणीतीने तिच्या सासऱ्यांना मिठी मारली आणि त्यांच्याबद्दल आपुलकी व्यक्त केली, तर ती राघव चड्ढाची आई म्हणजेच सासू आणि वहिनी यांच्यासोबत खूप धमाल करताना दिसली.
परिणिती चोप्रा आणि राघव यांनी अंगठी शोधण्याचा विधी देखील केला, ज्यामध्ये राघव चिटींग करताना दिसला तेव्हा सर्वजण हसले.
व्हिडिओच्या शेवटी, परिणिती म्हणते की राघव चड्ढा यांचे कुटुंब जगातील सर्वोत्तम कुटुंब आहे आणि ते तिला राणीसारखे वागवतात असे म्हटले.
परिणीतीच्या गृहप्रवेशावेळी परिणीतीचे आई-वडील आणि भाऊही उपस्थित होते आणि परिणीतीचा आनंद पाहून ते भावूक झाले होते.
परिणीतीच्या सासरच्या घरी ग्रँड वेलकमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते परिणीतीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि तिच्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर सेलेब्सही प्रतिक्रिया देत आहेत आणि नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देत आहेत.
राधव आणि परी यांचा 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये शाही विवाह झाला होता. या लग्नात फक्त कुटुंब आणि जवळचे लोक उपस्थित होते. लग्नानंतर दोघेही ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करणार होते, मात्र नंतर त्यांनी रिसेप्शनचा विचार रद्द केल्याचे समोर आले.