बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लव्ह बर्ड्स उदयपूर, राजस्थानमध्ये लग्न करणार आहेत. 23 आणि 24 सप्टेंबर रोजी लग्नाचे सर्व विधी पार पाडले जातील.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आप खासदार राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा या महिन्यात राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याचं ऐकायला मिळत आहे. 23 आणि 24 सप्टेंबर रोजी लीला पॅलेस आणि ओबेरॉय विलास येथे परिणीती आणि राघवच्या लग्नाचे सर्व विधी पार पडतील, ज्यामध्ये मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम आयोजित केला जाईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न समारंभात 200 हून अधिक पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार असून 50 हून अधिक व्हीव्हीआयपी पाहुणे लग्न समारंभाला उपस्थित राहू शकतात.
लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी उदयपूरचा लीला पॅलेस आणि उदयविलास हॉटेल बुक करण्यात आले आहे. या दोन हॉटेलमध्ये सर्व पाहुण्यांची राहण्याची सोय केली जाईल. जोडप्याच्या कुटुंबीयांनी हॉटेल बुकिंगची खात्री करताच येथे लग्नाची तयारी सुरू झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अनेक नेते या लग्नाला हजेरी लावणार असल्याचेही ऐकायला मिळाले आहे.
अभिनेत्रीची चुलत बहीण प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास देखील लग्नाला उपस्थित राहण्यासाठी भारतात येणार आहेत. बुक केलेल्या हॉटेलच्या सूत्रानुसार, हळदी समारंभ, मेहंदी आणि संगीत विवाह कार्यक्रम 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत.
लग्न पूर्ण झाल्यानंतर हे जोडपे हरियाणातील गुरुग्राममध्ये रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत. राजस्थानच्या लीला पॅलेस आणि उदयविलास व्यतिरिक्त जवळपासच्या तीन हॉटेल्समध्ये पाहुण्यांसाठी बुकिंगही करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी पाहुण्यांची सुरक्षा लक्षात घेऊन गुप्तचर अधिकाऱ्यांकडून हॉटेल्सची तपासणी करण्यात आली आहे.