'बिग बॉस ओटीटी'चा दुसरा सीझन सुरू झाला असून प्रेक्षकांना तो खूप आवडला आहे. यावेळी अभिनेत्री निर्माती आणि महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट हिने देखील शोमध्ये प्रवेश केला आहे. तिथे ती आपल्या आयुष्याशी संबंधित काही खुलासे करत आहेत, आम्ही भट्ट यांच्याबद्दल असाच एक किस्सा सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. ही कथा पूजा भट्ट आणि बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान यांच्या लव्ह लाईफशी संबंधित आहे.
खूप कमी लोकांना माहिती असेल की, एक काळ असा होता जेव्हा पूजा भट्टला सलमान खानच्या घरची सून व्हायचं होतं. तिचे मन सलमानने नाही, तर त्याच्या घरातील अन्य सदस्याने चोरले होते. मात्र सलमानचे वडील सलीम खान त्याच्या प्रेमकथेत खलनायक ठरले आणि त्यांच्या घरची सून होण्याचे पूजाचे स्वप्न अधुरेच राहिले.
सलीम खानला पूजा भट्टचा बोल्डनेस पसंत नव्हता
पूजा भट्टने तिचे मन सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान याला दिले होते. 90 च्या दशकात पूजा भट्टने सलमान खानसोबत एक चित्रपट साइन केला होता. या चित्रपटाचे शीर्षक 'राम' होते आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन दुसरे कोणी नसून सलमानचा धाकटा भाऊ सोहेल करणार होता. जेव्हा सलमानने त्याचे वडील सलीम खान यांना या चित्रपटासाठी पूजा भट्टला साईन करत असल्याचे सांगितले तेव्हा ते संतापले. खरे तर या चित्रपटात सलमान आणि पूजाची जोडी असावी असे सलीम खानला वाटत नव्हते. त्यावेळी पूजा भट्टची प्रतिमा एका बोल्ड बिंदास नायिकेची होती. ती अनेक वादांमध्येही अडकली होती. त्यामुळे सलीमला त्यांचा मुलगा सलमानने पूजासोबत काम करावे असे वाटत नव्हते. मात्र, सलमानने त्याचे वडील सलीम खान यांना कसेतरी पटवले होते आणि चित्रपट सुरू झाला होता की पूजा भट्ट सोहेलला पसंत करू लागली आणि परिस्थिती आणखी बिघडली.
अशी प्रेमकहाणी सुरू झाली
रिपोर्ट्सनुसार, जेव्हा राम चित्रपटाची शूटिंग सुरू झाली तेव्हा पूजा आणि सोहेल शूटिंगदरम्यान जवळ येऊ लागले आणि एकमेकांवर प्रेम करू लागले. ही बाब सलीम खान यांना समजताच ते चांगलेच संतापले. त्यांना हे नाते अजिबात मंजूर नव्हते. सलमानने त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते मानायला तयार नव्हते. अखेर सलीम खानच्या नाराजीमुळे सोहेल आणि पूजाला वेगळे व्हावे लागले आणि पूजाचे खान कुटुंबाची सून होण्याचे स्वप्न भंग पावले.
नाते तुटल्यावर चित्रपटही थांबला.
सलीम खानची नाराजी आणि सोहेलसोबत ब्रेकअप झाल्यामुळे ‘राम’ चित्रपटही रखडल्याचे बोलले जाते.. पूजा भट्ट आणि सलमान खान बजेटमुळे थांबले असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले असले तरी सत्य हे आहे की सोहेल आणि पूजा यांच्यातील तुटलेल्या नात्यामुळे चित्रपटाचे काम थांबले होते.
अनेक वर्षांनंतर पूजा भट्टने मनीष माखिजासोबत लग्न केले पण इथेही त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्याचवेळी सोहेलने सीमा सजदेहसोबत लग्नही केले होते, मात्र आता दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत.