Close

अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा संपन्न! लवकरच बांधणार लग्नगाठ ( Pooja Sawant Gets Engaged with Siddhesh Chavan, Soon To Be married)

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत हिने नुकताच साखरपुडा उरकला. पूजाच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. साखरपुड्याला पूजाने हिरवी भरझरी गाडी, नथ असा साज केला होता. तर तिचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण ऑफ वाईट रंगाची शेरवानी परिधान केलेली. काही दिवसांपूर्वीच पूजाने सोशल मीडियावर एक गुढ पोस्ट शेअर करत आपल्या रिलेशनशिप बद्दल जगाला सांगितले होते. सुरुवातीच्या पोस्टमध्ये तिने सिद्धेश चा चेहरा दाखवला नव्हता. नंतर तिने तो दाखवला तेव्हापासून तिच्या लग्नाच्या चर्चा सुरू झालेल्या.

वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये पूजाने आपण फेब्रुवारी मार्च महिन्यात लग्न करू असा इशारा दिलेला. आता तिने साखरपुडा करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे. पूजा आणि सिद्धेश चे अरेंज मॅरेज आहे.

सिद्धेश हा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात राहतो. तर पूजा तिच्या चित्रपटांच्या शूटिंग निमित्त भारतातच असते. काही दिवसांपूर्वीच तिचा मुसाफिर हा सिनेमा रिलीज झाला. दगडी चाळ या सिनेमासाठी ती विशेष लोकप्रिय आहे.

Share this article