प्रियांका चोप्राचा मिस वर्ल्ड स्पर्धेतला व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्याची ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आजकाल हॉलिवूडमध्ये खूप सक्रिय असते. अभिनेत्री २००० साली मिस वर्ल्ड हा किताब पटकावला होता.
या स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत प्रियांकाला , 'तुम्हाला आजची सर्वात यशस्वी महिला कोण वाटते आणि का?' असा प्रश्न विचारला गेला. यावर प्रियांकाने उत्तर दिले, पण ते चुकीचे ठरले. प्रियांकाने मदर तेरेसा यांचे नाव घेत आपले मत व्यक्त केले. पण आता त्यावेळी प्रियांकाने चुकीचे उत्तर दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
ती म्हणाली होती, 'मी खूप लोकांची प्रशंसा करते, परंतु माझ्या आवडत्या लोकांपैकी एक म्हणजे मदर तेरेसा, ज्या खूप दयाळू, विचारशील आणि प्रेमळ आहेत. त्यांनी आपल्यासाठी आणि अनेक देशांसाठी खूप काही मिळवले आहे. इतरांचे जीवन सुंदर बनवण्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला.
प्रियांकाच्या या उत्तराला त्यावेळी प्रेक्षकांच्या भरपूर टाळ्या मिळाल्या पण २००० मध्ये मदर तेरेसा हयात नसल्याने ते उत्तर चुकीचे ठरले. मदर तेरेसा यांचे १९९७ मध्ये निधन झाले होते आणि प्रियांकाने उत्तर देताना त्या हयात असल्याप्रमाणे दिलेले.
२०२२ मध्ये प्रियंका चोप्राची प्रतिस्पर्धी लीलानी मॅककॉन्की हिने प्रियांकाच्या विजयाचा निकाल खूप घाईघाईत घेतलेला असा दावा केला.