Close

दसऱ्याच्या दिवशी पुणे येथील श्री महालक्ष्मी देवीचे सुवर्णवस्त्रात दर्शन (Pune Mahalakshmi Devi Wears 16 Kg Gold Saree Marathi News)

पुणे येथील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या मूर्तीला तब्बल १६ किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे. विजयादशमीनिमित्त देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे.

ही १६ किलो सोन्याची साडी दक्षिण भारतातील कारागिरांनी तयार केली आहे. २१ वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी तयार करण्यात आली होती. अनेक कारागिरांनी सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम केले. त्यानंतर ही साडी पूर्ण झाली.

महालक्ष्मी देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. वर्षभरातून दोन वेळेस म्हणजे दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसवली जाते. देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता भाविकांची चांगलीच गर्दी होते.

साडीवर आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे. १६ किलो सोन्याची साडी परिधान केलेले श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी देवीभक्तांकडून दरवर्षी गर्दी केली जाते. यावर्षी दसऱ्यानिमित्त सकाळपासून अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिराची निर्मिती १९८४ मध्ये करण्यात आली. मंदिरात मनमोहक श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली देवीची मूर्ती आहे. तसेच मंदिराची परिक्रमा करताना बारा संतांचे दर्शन होते.

Share this article