Close

धुमधडाक्यात साजरा झाला दिशा परमारचा डोहाळे जेवणाचा सोहळा, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर झळकत होते गरोदरपणाचे तेज (Rahul Vaidya hosts grand Baby Shower for Disha Parmar, See PICS)

'बडे अच्छे लगते हैं 2' या मालिकेत प्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा परमार आणि तिचा पती गायक राहुल वैद्य लवकरच आई-बाबा होणार आहेत. दिशा सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा टप्पा एन्जॉय करत आहे. राहुल आणि दिशा दोघेही त्यांच्या पहिल्या बाळाबद्दल खूप उत्सुक आहेत. दिशा परमार आपले बेबी बंपचे छायाचित्रे शेअर करत असते, ज्यावर तिचे चाहते खूप प्रेम करतात.

आता नुकताच  दिशा परमारचा बेबी शॉवर सोहळा पार पडला, ज्याचे काही सुंदर फोटो दिशाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहेत.

दिशा परमार तिच्या बेबी शॉवरमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. तिने लॅव्हेंडर रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना खूप सुंदर दिसत होती. दिशाने तिचा लूक साधा ठेवला. कानातले, आय शॅडो आणि ग्लॉसी न्यूड लिप्स्टिक मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्ट दिसत होती.

तर राहुल वैद्यही प्रिंटेड शर्ट आणि पांढर्‍या पँटमध्ये डॅशिंग दिसत होता. आई-वडील होणार असल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

दिशा परमार आणि राहुल वैद्य यांनी बेबी शॉवर दरम्यान पापाराझींना पोझ दिल्या.

बेबी शॉवरचे ठिकाण रंगीबेरंगी फुग्यांनी सजवण्यात आले होते. मागे एक स्टँडी देखील होता त्यावर. "दिशूलच्या बेबी शॉवरमध्ये तुमचे स्वागत आहे."

यावेळी दिशा आणि राहुल यांनी मिळून एक अनोखा केक कापला. या डबल केकवर एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन बाळं बनवली होती आणि त्यांच्या हातात फुगे होते. या केकवर दिशूल बेबी केक असे लिहिले होते. केक कापताना दोघांचा आनंद पाहण्यासारखा होता.

केक कटिंग सेरेमनीनंतर दोघांनी आपल्या मित्रांसोबत खूप एन्जॉय केला. राहुल आणि दिशानेही डान्स फ्लोअरला धमाल केलेली. दोघांचा एक डान्स व्हिडिओही व्हायरल होत आहे.

दिशाच्या बेबी शॉवरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिशाच्या सौंदर्यावर चाहत्यांच्या नजरा हटत नाहीत. आता सर्वजण या अभिनेत्रीकडून आनंदाची बातमी ऐकण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Share this article