गायक आणि बिग बॉस फेम राहुल वेदयच्या घरी दुहेरी आनंदाचे वातावरण आहे. आधी त्याच्या घरी गणराज विराजमान झाले तर त्याच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीने जन्म घेतला. म्हणजेच अभिनेत्री दिशा परमार आणि राहुल यांना मुलगी झाली आहे. 20 सप्टेंबर 2023 रोजी या दोघांच्या पोटी एका छोट्या राजकुमारीचा जन्म झाला. आता राहुलने वडील झाल्याबद्दलच्या भावना शेअर केल्या आहेत. त्याने सांगितले की आपल्या मुलीचा चेहरा पाहताच तो रडू लागला होता. एकदा नाही तर चार-पाच वेळा हा सुंदर क्षण कळल्यावर तो रडला.
'हिंदुस्तान टाइम्स'शी संवाद साधताना राहुल वैद्यने पालक बनण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, 'ही भावना व्यक्त करता येत नाही. मला जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती झाल्यासारखं वाटलं. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने माझ्या घरी लक्ष्मी आली आहे.
यासोबतच राहुल वैद्यने पत्नी दिशा परमार हिच्या आरोग्याची माहिती दिली. मुलगी आणि दिशा दोघीही ठीक असल्याचे त्याने सांगितले. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे.
राहुल वैद्य खूप रडला, आनंदाचे अश्रू आवरले नाहीत
गायक राहुल वैद्यने आपल्या मुलीला पहिल्यांदा पाहण्याचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला, 'मला मुलगी झाल्याचे समजताच मी तीन-चार तास गप्प बसलो. काय होत आहे ते मला समजत नव्हते. मी पाच सहा वेळा रडलो. आताही जेव्हा जेव्हा मी माझ्या मुलीला पाहतो तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू येतात. मी बोललो तरी हुंदका निघतो. ही सर्व एक अतिशय वेगळी अनुभूती आहे.
सोनू निगमने पहिला फोन केला
राहुल वैद्यने खुलासा केला की, गायक सोनू निगम हीच इंडस्ट्रीतील व्यक्ती होती ज्याने त्याला या क्षणी पहिल्यांदा कॉल केला होता. आणि अभिनंदन केले. तो म्हणाला, 'सोनू निगम जीने मला फोन केला आणि सांगितले की आमचा मुलगा बाप झाला आहे.'
राहुल वैद्य आपल्या मुलीचे नाव काय ठेवणार?
राहुलला त्याच्या मुलीच्या नावाबाबत विचारणा करण्यात आली होती. यावर त्याने अद्याप नाव पूर्णपणे ठरवले नसल्याचे सांगितले. काही नावे निश्चितपणे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. पण राशीनुसार तो नाव ठेवणार हे निश्चित.