Close

राखी सावंतची जिवलग मैत्रिण राजश्रीनेच तिच्याविरोधात दाखल केली पोलिसात तक्रार (Rakhi Sawant Best Friend Rajashree Police Complainst Against Her)

ड्रामा क्विन राखी सांवत ही गेल्या काही दिवासांपासून सतत चर्चेत आहे. रोजच्या रोज तिच्या अडचणींमध्ये भर पडत आहे. आता तर तिची जिवलग मैत्रिण राजश्रीनेच तिच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी जेलमधून बाहेर आल्यापासून दोघंही पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातच राजश्री देखील राखीच्या विरोधात गेल्याने राखीच्या अडचणींत वाढ होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

राजश्रीने राखी सावंत विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. राजश्री म्हणते की, जेव्हापासून आदिलने मीडियासमोर राखीविरोधात वक्तव्य केले आहे. तेव्हापासून राखी त्याला धमक्या देत होती. याशिवाय राजश्रीने काहीही बोलण्यास नकार दिला आहे. ती लवकरच मीडियासमोर सर्व काही उघड करणार असल्याचे तिने म्हटले आहे.

राजश्रीच्या पोलिस तक्रारीनंतर आता राखी सावंतने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. राखीने विरल भयानीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. तिने कमेंट करत लिहिले की, 'माझ्या वाईट काळात तू नेहमीच माझ्यासोबत होतीस आणि तुझ्या वाईट काळात मी नेहमीच तुझ्यासोबत होती. तू नेहमीच माझी चांगली मैत्रीण असशील. मला धक्का बसला आहे. माझ्या आयुष्यात काय चाललं आहे हे मला समजत नाही. शाब्बास आदिल, तू पुन्हा माझा मित्रांचा वापर केला आहे. मी प्रत्येक गोष्टीविरुद्ध लढेन. माझ्यासोबत देव आहे.'

Share this article