रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी त्यांच्या लग्नामुळे सतत चर्चेत असतात. दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 21 फेब्रुवारीला गोव्यात लग्न केले आता हे पती-पत्नी सोशल मीडियावर सध्या लग्नापासून ते वेडिंग फंक्शनपर्यंतच्या फोटोंनी धुमाकूळ घालत आहे.
दरम्यान, हे जोडपे आता सुवर्ण मंदिरात पोहोचले आहे.रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी त्यांच्या लग्नाच्या आदल्या दिवशी एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते, जिथे नवविवाहित जोडपे हातात हात घालून आले होते. लग्नानंतर दोघांचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता. आता लग्नाच्या एका आठवड्यानंतर दोघेही अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात पोहोचले आहेत, दोघांनी आशीर्वाद घेतले आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना केली.रकुलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पती जॅकीसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत.
एका फोटोत रकुल आणि जॅकी सुवर्ण मंदिरासमोर पोज देताना दिसत आहेत. रकुलसोबत तिचे आई-वडीलही सुवर्ण मंदिरात पोहोचले, ज्यांच्यासोबत रकुलनेही एक फोटो शेअर केला आहे. यावेळी नवविवाहित वधू रकुल प्रीत साध्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. पिवळ्या रंगाच्या सलवार सूटमध्ये तिची मेहेंदी उठून दिसली, तर जॅकी लाल कुर्ता आणि पांढऱ्या पायजमामध्ये देखणा दिसत होता.रकुल प्रीत आणि जॅकीने २१ फेब्रुवारीला गोव्यात मोठ्या थाटामाटात लग्न केले.
या दोघांचेही शीख आणि सिंधी रितीरिवाजानुसार लग्न झाले होते. रकुलने तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये लग्न, हल्दी, मेहंदी आणि संगीतातील अनेक झलक आहेत. चाहत्यांना हे फोटो खूप आवडत आहेत आणि चाहते या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.