Close

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात लक्ष्मण फेम सुनील लहरींना आमंत्रण नाही, नाराजी केली व्यक्त ( Ramayana Serial Fame Sunil Lahiri Aka Laxman is not invited to the opening ceremony of Ayodhya Ram Mandir)

अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्याला नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्गज सेलिब्रेटींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकेकाळी रामायण मालिका गाजवणारे राम सीता म्हणजेच अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना देखील आमंत्रण दिले आहे.

पण या सर्वात रामायण मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लाहिरी यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सुनील लहिरी म्हणाले, 'प्रत्येक वेळी तुम्हाला बोलावलेच पाहिजे असे नाही. मला बोलावले असते तर मी नक्कीच गेलो असतो. मला आमंत्रित केले असते तर मला आवडले असते. मलाही इतिहासाचा भाग बनण्याची संधी मिळाली असती, पण हरकत नाही. यात काळजी करण्यासारखे काही नाही.

, 'कदाचित त्यांच्यामते लक्ष्मणाचे पात्र तितकेसे महत्त्वाचे नसावे किंवा त्यांना मी वैयक्तिकरित्या आवडत नसावा. मी प्रेमसागरसोबतच होतो, पण त्यांनाही बोलावले नाही. मला हे थोडे विचित्रच वाटते की त्यांनी रामायणाच्या कोणत्याही निर्मात्यांना आमंत्रित केले नाही.

ते पुढे म्हणाले, 'कुणाला निमंत्रित करायचे कोणाला नाही, हा समितीचा वैयक्तिक निर्णय आहे. मी ऐकले की ७००० पाहुणे आणि ३००० VIP आमंत्रित आहेत. त्यामुळे मला वाटते की त्यांनी रामायण शोशी संबंधित असलेल्यांना, विशेषत: मुख्य कलाकार आणि निर्मात्यांनाही आमंत्रित करायला हवे होते.

Share this article