प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा शो 'द ग्रेट इंडियन कपिल' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या शोचा प्रोमो रिलीज झाला. या शोचा प्रोमो पाहून प्रेक्षक खूपच उत्सुक झाले आहेत. कपिल शर्माचा हा शो येत्या ३० मार्चपासून नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. या शोचे अनेक प्रोमो व्हिडीओ समोर येत असून ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या शोमध्ये पहिले गेस्ट म्हणून रणबीर कपूर (Ranbir Kapoor), नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि रिद्धिमा कपूर सहानी सहभागी झाले आहेत. त्यांचा प्रोमो व्हिडीओ व्हायरल होत आहे. या शोमध्ये रणबीर कपूरने अनेक खुलासे केले आहेत.
'द ग्रेट इंडियन कपिल' या शोचा प्रोमो नुकताच रिलीज झाला. पहिल्यांदाच कपूर कुटुंब एका शोमध्ये एकत्र दिसत आहे. यासोबतच प्रोमोमध्ये रणबीर, नीतू आणि रिद्धिमा मजा-मस्ती करताना दिसत आहेत. कपूर कुटुंबीय या शोची रिबन कापणार आहेत. रणबीर कपूर आपल्या गर्लफ्रेंडला रिद्धिमाचे कपडे गिफ्ट द्यायाचा, याबाबत कपिल शर्मा प्रश्न विचारतो. यावर चर्चा करत असताना रणबीरने असं काही उत्तरं दिलं की या कार्यक्रमातील प्रेक्षक जोरजोरात हसू लागतात.
रणबीर, नीतू आणि रिद्धिमा यांनी संपूर्ण टीमसोबत खूप मजा केली. यावेळी पुन्हा एकदा रणबीरच्या जुन्या दिवसांची कहाणी समोर आली. यावेळी रणबीर कपूर सांगतो की, त्याने फक्त रिद्धिमाचे कपडे त्याच्या गर्लफ्रेंडला गिफ्ट दिले नाहीत. तर आईचे दागिने देखील गर्लफ्रेंडला गिफ्ट म्हणून दिले आहेत. यावेळी रिद्धिमा सांगते की, 'आमच्या पिढी खूपच वेगळी होती. आम्ही सर्वात जास्त मजा केली आहे.' रणबीर कपूरच्या चाहत्यांना हा प्रोमो व्हिडिओ खूपच आवडला आहे.
दरम्यान, द ग्रेट इंडियन कपिल शो ३० मार्चपासून दर शनिवारी रात्री ८ वाजता फक्त नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल. या शोच्या माध्यमातून कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. हे दोघेही प्रेक्षकांना खळखळवून हसवताना आणि जुगलबंदी करताना दिसणार आहेत. नुकताच द ग्रेट इंडियन कपिल शोचा ट्रेलर रिलीज झाला. जो खूप पसंत केला जात आहे. या शोबद्दल अनेक चाहत्यांनी उत्सुकता व्यक्त केली आहे.
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)