Close

माझा जावई म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेता नव्हे तर…. महेश भट्ट यांनी केले रणबीर कपूरचे कौतुक (Ranbir Kapoor Gets Emotional As Mahesh Bhatt Praises him by video)

'इंडियन आयडॉल सीझन 14' या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आलेल्या रणबीर कपूरला त्याचे सासरे महेश भट्ट यांच्याकडून खास संदेश मिळाला. या व्हिडिओ मेसेजमध्ये महेश भट्ट यांनी त्यांचा जावई रणबीर कपूर याला जगातील सर्वोत्तम वडील असे संबोधले आहे.

रणबीर कपूर अलीकडेच 'इंडियन आयडॉल सीझन 14' या रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता. अभिनेता त्याच्या आगामी 'एनिमल' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याची कोस्टार रश्मिका मंदान्नासोबत इंडियन आयडॉलमध्ये गेला होता. शो दरम्यान, रणबीर कपूरचे सासरे महेश भट्ट यांनी त्यांचा जावई रणबीरसाठी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मेसेजमध्ये महेश भट्ट यांनी रणबीरचे कौतुक करत त्याला जगातील सर्वोत्तम वडील म्हटले आहे.

https://x.com/Ranbirian4ever/status/1728460339556274574?s=20

शेअर केलेल्या व्हिडिओ मेसेजमध्ये महेश भट्ट म्हणाले- मी आलियाला चमत्कार मानतो. ती म्हणते की रणबीर कपूर आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. पण रणबीर हा जगातील सर्वोत्कृष्ट वडील आहे यावर माझा विश्वास आहे. जेव्हा तो राहा कडे पाहतो तेव्हा तुम्ही त्याचे डोळे पाहा. इतकंच नाही तर त्याची आई नीतू कपूर देखील म्हणते की रणबीर आपली मुलगी राहावर जे प्रेम करतो ते फक्त आईच करु शकते. रणबीर कपूर माझा जावई असल्याचा मला अभिमान आहे.

रणबीर कपूर आपल्या सासऱ्यांकडून कौतुक ऐकून भावूक गेला आणि म्हणाला- त्यांनी आजपर्यंत माझ्याशी अशा वैयक्तिक गोष्टी कधीच बोलल्या नाहीत, मला हे सांगितल्याबद्दल इंडियन आयडलचे आभार. मी माझ्या सासरी पास झालो आहे.

या शो दरम्यान, जेव्हा रणबीरला विचारण्यात आले की तो आपल्या मुलीसाठी कोणती गाणी गातो, तेव्हा अभिनेत्याने उत्तर दिले की एक इंग्रजी गाणे आहे, जे थोडेसे इरिटेटिंग करणारे आहे - बेबी शार्क टू डू डू आणि दुसरे 'लल्ला लल्ला लोरी'.

Share this article