बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. मात्र सध्या रणबीरचे नाव वादांच्या भोवऱ्यात सापडले आहे. देशाच्या अंमलबजावणी संचालनालय ईडीने अभिनेता रणबीर कपूरला समन्स पाठवले आहे. ऑनलाइन गेमिंग अॅपबाबत ईडीकडून अभिनेत्यावर कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.
आपल्या दमदार चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा रणबीर कपूर सर्वांचा लाडका आहे. पण ऑनलाइन गेमिंग अॅपमध्ये अभिनेत्याचे नाव अडकत असल्याची बातमी समोर येताच खळबळ उडाली. ANI वृत्तसंस्थेनुसार - "अभिनेता रणबीर कपूरला अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने समन्स पाठवले आहेत."
महादेव ऑनलाइन गेमिंग अॅपमुळे रणबीरचे नाव अडचणीत आले आहे. ईडीने या प्रकरणी ६ ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावले आहे.'' एवढेच नाही तर रणबीर कपूर व्यतिरिक्त जवळपास १५-२० बॉलिवूड सेलिब्रिटी ईडीच्या निशाण्यावर आहेत.
भविष्यात ईडी त्यांना चौकशीसाठी बोलावू शकते. अशा परिस्थितीत या प्रकरणाबाबत आणखी कोणकोणत्या कलाकारांची नावे पुढे येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. स्वच्छ प्रतिमेसाठी प्रसिद्ध असलेल्या रणबीर कपूरसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
रणबीर कपूरवर ईडीने केलेल्या या कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे, त्यामुळे अभिनेत्याचे नाव सतत चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महादेव ऑनलाइन गेमिंग अॅपच्या प्रमोशनसाठी अभिनेत्याने मोठी रक्कम गोळा केल्याचा ईडीला संशय आहे. यामुळेच आता ईडीने येत्या शुक्रवारी रणबीर कपूरला चौकशीसाठी बोलावले आहे.