मराठी आणि आता हिंदीतलेही लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनी नुकताच आपल्या कोकणाच्या घरी शिमग्याचा आनंद घेतला. ज्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कोकणात शिमग्याच्या काळात प्रत्येक घरात ग्रामदेवतेची पालखी जाते. तेव्हा घरातले लोक या पालखीची मनोभावे पुजा करतात. देवाला खास नैवेद्य दाखवतात. गावकरी आणि चाकरमनी मिळून ही पालखी नाचवतात.
रवी जाधव ही नुकतेच आपल्या कोकणातील संगमेश्वर येथील घरी पालखीसाठी गेलेले. “माझ्या कोकणातील गावची पालखी” असे कॅप्शन त्यांनी पालखीचा व्हिडिओ शेअर करताना लिहिले. या व्हिडिओत रवी यांच्या घराचीही झलक पाहायला मिळते. तसेच गावकरी मोठ्या उत्साहात देवाची पालखी आपल्या खांद्यावर घेऊन नाचवत मिरवणूकीत सहभागी झाले आहेत.
रवी जावध यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचा मे अटल हू हा सिनेमा सर्वात शेवटी प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षक आणि समिक्षकांच्या समिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. त्यापूर्वी त्यांची ट्रान्सजेंडरवर आधारित ताली ही सिरीज फार गाजली. ज्यात सुष्मिता सेन हीने प्रमुख भूमिका साकरलेली.