Close

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू रवींद्र बेर्डे यांचं निधन (Ravindra Berde Passed Away)

मराठी सिनेसृष्टीत आपल्या भूमिकांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते. काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलं होतं. अखेर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.

रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रवींद्र यांनी बंधू लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

१९९५ मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकादरम्यान रवींद्र बेर्डे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावर मात केल्यानंतर २०११ मध्ये त्यांना कर्करोगाचं निदान झालं. आजारपणातही त्यांनी नाटकाची आवड कायम जपली. रवींद्र बेर्डे यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं होतं. सिंघम, चिंगी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. १९६५ पासून त्यांची नाट्यसृष्टीशी नाळ जोडली गेली. हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, झपाटलेला, भुताची शाळा, गंमत जंमत, एक गाडी बाकी अनाडी, खतरनाक यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली.

रवींद्र बेर्डे यांनी ३०० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांची अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्यासोबतची जोडी हिट ठरली होती. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/