बॉलिवूड अभिनेत्री आणि महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनीसाहेब जिनिलीया देशमुख आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. रितेश आणि जिनिलीयाला संपूर्ण महाराष्ट्र दादा-वहिनी या नावानं हाक मारतो. सर्वांच्या लाडक्या वहिनीसाहेबांसाठी दादानं देखील खास सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. सोशल मीडियावर या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे.
रितेश काय आणि जिनिलीया काय दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या भन्नाट रिल्सनं सर्वांचे लक्षवेधून घेत असतात. आत रितेशनं बायको जिनिलीया हिच्यासाठी खास बर्थडे पोस्ट लिहिली आहे. त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “तू माझी खूप चांगली जिवलग मैत्रीण, माझ्या कठीण काळात मला कायम साथ देणारी माझी सर्वात चांगली सहकारी आहेस. तू मला कायम प्रोत्साहन दिलेस. my everything तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! माझे जीवन सुखी आणि समृद्ध केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार… माझी बायको, माझं वेड…लव्ह यू जिनिलीया.” रितेशच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलेब्सनी देखील कमेंट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अभिनेत्री जिनिलीया देशमुखने याचवर्षी ‘वेड’ या मराठी चित्रपटाद्वारे मराठी कलाविश्वात पदार्पण केले होते. याआधी जिनिलीयाने तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्ल्याळम भाषिक चित्रपटांमध्ये काम करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेवटची ती जिओ सिनेमाच्या ‘ट्रायल पीरियड’ या हिंदी चित्रपटामध्ये झळकली आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता.
रितेश आणि जिनिलीया देशमुख यांची जोडी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय आहे. जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर दोघांनीही २०१२ मध्ये लग्न केले. रितेशला प्रत्येक गोष्टीत जिनिलीयाने खंबीरपणे साथ दिली. आता त्या दोघांना रियान आणि राहील नावाची दोन मुलंही आहेत.