Close

रोशेल आणि किथच्या बाळाला जन्मताच ठेवले NICU मध्ये, अभिनेत्रीने सांगितले कसे होते ते दिवस (Rochelle Rao-Keith Sequeira’s baby girl was kept in NICU after birth, Rochelle Rao pens a long note)

रोशेल राव आणि किथ सिक्वेरा एका बाळाचे पालक झाले आहेत. 'द कपिल शर्मा शो' अभिनेत्री रोशेल रावने 1 ऑक्टोबर रोजी एका मुलीला जन्म दिला. लग्नाच्या पाच वर्षांनंतर आई-वडील झालेल्या दाम्पत्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. काल, रोशेलने तिच्या मुलीची पहिली झलक देखील शेअर केली होती, ज्यामध्ये कीथ बाळाचा धरताना दिसला होता. आता रोशेलने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने प्रत्येक खास क्षण शेअर केला आहे. त्यात लेबर रूमपासून बाळाला घरी आणण्यापर्यंत सर्व गोष्टी पाहायला मिळतात. याशिवाय मुलीच्या जन्मानंतर होणाऱ्या गोंधळाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

रोशेलने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की तिच्या बाळाला जन्मताच एनआयसीयूमध्ये दाखल करावे लागले आणि यामुळे रोशेल आणि कीथ घाबरले होते. व्हिडीओमध्ये रोशालने तिच्या मुलीच्या जन्मापासून ते आत्तापर्यंत घरी स्वागत करण्यापर्यंतची झलक दाखवताना वेदनाही व्यक्त केली.

रोशेल रावने आपल्या बाळाला जन्मानंतर लगेचच एनआयसीयूमध्ये कसे दाखल करावे लागले हे सांगितले आहे. जन्माच्या वेळी बाळाचे वजन खूपच कमी होते. त्यामुळे त्याला आपत्कालीन परिस्थितीत एनआयसीयूमध्ये ठेवावे लागले.

व्हिडिओच्या सुरुवातीला रोशेलने बाळाला पहिल्यांदा पाहिल्यानंतर तिची आणि कीथची काय प्रतिक्रिया होती हे दाखवले आहे. तिला पाहताच आपण तिच्या प्रेमात पडलो असे तिने सांगितले. गेले दोन आठवडे त्यांच्यासाठी आनंदाचे असूनही ते खूप कठीण होते

व्हिडिओ शेअर करताना रोशेलने व्यथा मांडली आणि लिहिले - "तो क्षण खूप भीतीदायक होता. बाळाला एनआयसीयूमध्ये ठेवल्याचे ऐकून मी खूप घाबरले होते. पण या प्रवासात कुटुंब माझ्यासोबत होते. तिला पहिल्यांदा पाहण्यापासून. आता रात्री ती उठेपर्यंत सर्व काही वेगळे असते. आपण या लहान बाळावर इतके प्रेम करू असे कधीच वाटले नव्हते. या सुंदर आशिर्वादासाठी देवाचे आभार. आशा आहे की आम्ही तिला स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती आणि जीवनाची सर्वोत्तम आवृत्ती देऊ शकू."

रोशेल आणि कीथची मुलगी दोन आठवड्यांची आहे. रोशेलने यावेळी हा भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच चाहत्यांचे प्रार्थना आणि आशीर्वादासाठी आभार मानले.

रोशेल राव आणि किथ सिक्वेरा यांनी 3 ऑक्टोबर रोजी आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून चांगली बातमी दिली. रोशेलने लिहिले, "मुलगी झाली या आशीर्वादासाठी देवाचे आभारी आहोत. आम्हाला आशीर्वाद मिळाला आहे. बेबी सिक्वेराचा जन्म 1 ऑक्टोबर 2023 रोजी झाला."

Share this article