रोहित शेट्टी हा इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारा दिग्दर्शक म्हणूनही गणला जातो आणि अहवालानुसार तो एका चित्रपट दिग्दर्शनासाठी तब्बल २५ कोटी रुपये आकारतो. सध्या रोहित त्याच्या खतरों के खिलाडी १४ या शो मुळे चर्चेत आला आहे.
खतरों के खिलाडीच्या १४व्या सीझनसाठी दर्शक बरेच उत्सुक आहेत. या सीझनसाठी रोहित शेट्टीने आपल्या मानधनामध्ये ५० टक्क्यांनी वाढ केली असल्याचे समजते. रोहित शेट्टी केकेकेच्या नव्या पर्वात प्रत्येक भागासाठी ६० ते ७० लाख रुपये आकारणार असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच हा सीझन पूर्ण होईपर्यंत रोहितच्या मानधनाचा आकडा १६ कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. काय मग चक्रावलात ना. अर्थात रोहितचं कामंही तितकंच प्रामाणिक आहे, यात शंका नाही.