Close

सरते शेवटी रुबीनाने गुड न्यूज दिलीच… पती अभिनव शुक्लासोबत शेअर केला बेबी बंपचा फोटो (Rubina Dilaik Confirms Pregnancy, Flaunts Baby Bump With Abhinav Shukla)

टीव्हीवरील 'छोटी बहू' फेम रुबिना दिलैक प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. अखेर रुबिनाने तिच्या गरोदरपणाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पती अभिनव शुक्लासोबतचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

अलीकडेच अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत शेअर केली आहे. पाच वर्षे सुखी वैवाहिक जीवन जगल्यानंतर रुबिना आणि तिचा पती अभिनव शुक्ला आता पालक होणार आहेत. या जोडप्याच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार आले तरीही त्यांचे प्रेम अबाधित राहिले.

अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या प्रेग्नेंसीची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांना वीकेंडची ट्रीट दिली. शेअर केलेल्या रोमँटिक फोटोंमध्ये, अभिनेत्री तिचा पती अभिनव शुक्लासोबत बेबी बंप दाखवताना दिसत आहे.

तिच्या प्रेग्नेंसीची गुड न्यूज शेअर करताना रुबिनाने लिहिले - जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही वचन दिले होते की आम्ही एकत्र जग एक्सप्लोर करू. मग लग्न झाले आणि आता आम्ही हे कुटुंब म्हणून वाढत आहोत. आम्ही लवकरच एका छोट्या प्रवाशाचे स्वागत करणार आहोत! रुबिना दिलैकने ही गोड बातमी शेअर करताच. काही मिनिटांतच सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत लोकांनी या जोडप्याचे अभिनंदन करायला सुरुवात केली.

रुबिना सध्या पती अभिनव शुक्लासोबत कॅलिफोर्नियामध्ये सुट्टी घालवत आहे. अभिनेत्री काही दिवसांपासून सतत तिच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिच्या चाहत्यांना तिच्या गरोदरपणाबद्दल कळू नये म्हणून अभिनेत्री खूप खबरदारी घेत होती. पण ती सोशल मीडिया यूजर्सच्या नजरेतून सुटू शकली नाही.

रुबिना गरोदर असून तिचा बेबी बंप लपवत असल्याचा त्यांचा अंदाज होता. प्रेग्नेंसीच्या अफवा व्हायरल झाल्यानंतर, अभिनेत्रीने अखेर तिच्या बेबी बंपची पुष्टी केली आहे.

Share this article