मराठी सिनेसृष्टीमध्ये नागराज मंजुळे यांचा सैराट हा सिनेमा इतिहास रचणारा ठरला. २०१६ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाने मराठी सिनेमांच्या यशाचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. विशेष म्हणजे आजही मराठीत या सिनेमाचा रेकॉर्ड कोणी ब्रेक करू शकलेले नाही. सैराट सिनेमात एक आगळीवेगळी लव स्टोरी पाहायला मिळाली.
https://www.instagram.com/reel/C3UU6jPN-1y/?igsh=Y3kyNTBlcmFudGNr
गावाकडील तालेवार मुलगी आणि एक सर्वसामान्य साधारण घरातील मुलगा यांच्यातील प्रेम, यांचा विरोध, लग्न आणि सर्वात महत्त्वाचं चित्रपटात दाखवण्यात आलेली मैत्री हे सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. सैराट या सिनेमाने मराठी चित्रपट सृष्टीला नवीन कलाकार दिले. आर्ची आणि परश्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर व रिंकू राजगुरु सोबत त्यांचे मित्र देखील लोकप्रिय झाले. या भूमिका अरबाज शेख आणि तानाजी गालगुंडे यांनी साकारलेली. तानाजी आणि अरबाज दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.
https://www.instagram.com/reel/C2wy2xBPhwT/?igsh=MXAxMmp0b2E2aHNi
काही दिवसांपूर्वी अरबाजने आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू ने देखील ही पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले. अरबाजने व्यवसाय सुरू केला आहे. त्याने स्वतःचे बेक बडीज वाचे कॅफे सुरू केलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या कॅफे बद्दल माहिती दिली. आज ११ फेब्रुवारी रोजी या कॅफेचे उद्घाटन झाले. पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज समोर, आंबेगाव बुद्रुक इथे अरबाजचं कॅफे आहे. उद्घटनापूर्वी नागराज मंजुळे यांनी या कॅफे ला भेट दिली होती.