अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार, हृतिक रोशन सिनेमांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतात. पण सेलिब्रिटी फक्त सिनेमांच्या माध्यमातूनच नाही इतर मार्गांनी देखील कोट्यवधी रुपये कमावतात. आज अशा काही सेलिब्रिटींबद्दल जाणून घेवू जे, इतरांच्या लग्नात किंवा पार्टीमध्ये डान्स करुन कोट्यवधी रुपये कमावतात. ज्यासाठी सेलिब्रिटी तगडं मानधन घेतात.
अभिनेत्री कतरिना कैफ देखील सिनेमांशिवाय इतर मार्गांनी कोट्यवधी रुपये कमावते. कतरिना एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोट्यवधी रुपये आकारते. मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना डान्स परफॉमेन्ससाठी तब्बल ३.५ कोटी रुपये मानधन घेते.
अभिनेता शाहरुख खान या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. शाहरुख सिनेमाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतो. पण लग्न आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेता तगडं मानधन घेतो. शाहरुख खान लग्न किंवा कार्यक्रमात सहभागी आणि डान्स परफॉमेन्ससाठी तब्बल ३ कोटी रुपये मानधन घेतो.
अभिनेता अक्षयकुमार देखील इतर मार्गांनी कोट्यवधी रुपये कमावतो. अक्षय बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. यामुळेच लग्न किंवा पार्ट्यांसाठी अभिनेता तगडं मानधन घेतो. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात सहभागी होण्यासाठी अक्षय अडीच कोटी रुपये घेतो.
अभिनेता हृतिक रोशन याची गणना बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्यांमध्ये केली जाते. हृतिक आपल्या डान्स आणि अभिनयाने लाखो हृदयांवर राज्य करतो. लग्न किंवा पार्ट्यांसाठी अभिनेता तगडं मानधन घेतो. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात सहभागी होण्यासाठी हृतिक अडीच कोटी रुपये घेतो.
अभिनेता सालमान खान या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. आपल्या कार्यक्रमांमध्ये सलमान खान याला सामिल करुन घेण्यासाठी अनेक जण उत्साही असतात. पण यासाठी सलमान खान कोट्यवधी रुपये घेतो. लग्नात सहभागी होण्यासाठी सलमान खान दोन कोटी रुपये घेतो.