Close

लग्नाच्या कपड्यांमध्ये सामंथाने केले मोठे बदल, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, नवी सुरुवात केलीच पाहिजे (Samantha Ruth Prabhu Redesign Her Wedding Gown)

समंथाने पॅन इंडिया चित्रपटांमध्ये आपले पंख पसरवण्यास सुरुवात केली आहे. समांथा तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे. आता पुन्हा ती तिच्या आउटफिटमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिने असे काही केले की त्यामुळे लोकांनी तिचे कौतुक करायला सुरुवात केली आहे. यावेळी सामंथाने तिच्या वेडिंग गाऊनसोबत काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे.  

समंथाची ही आयडिया यावेळी संपूर्ण फॅशन इंडस्ट्रीवर भारी पडली आहे. अभिनेत्रीने तिचा वेडिंग गाऊन पुन्हा डिझाइन केला आहे. तिने आपल्या लग्नातल्या गाऊनचे अतिशय सुंदर आणि स्टायलिश ब्लॅक बॉडीकॉन गाऊनमध्ये रुपांतर केले आहे.

हा गाऊन बनवताना समांथाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये सामंथाचे डिझायनर तिच्या वेडिंग गाऊनवर अतिशय काळजीपूर्वक काम करताना दिसत आहेत.

समंथाचे कौतुक केले जात आहे

सामंथाने या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नवीन आठवणी नेहमी बनवता येतात. चालण्यासाठी नेहमीच नवीन मार्ग खुले असतात. सांगण्यासाठी नेहमीच नवीन कथा असतात.

अभिनेत्रीचा हा ड्रेस मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. समांथाच्या चाहत्यांनी तिच्या या कल्पनेचे खूप कौतुक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्या गाऊनला 'रिव्हेंज गाऊन'असे टायटलही दिले आहे.

Share this article