Close

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत संजीवनी जाधव साकारणार इंद्रा कोळीण (Sanjeevani Jadhav To Portray Fisherwoman Koleen Indra’s Dynamic Character In ‘Premachi Gosht’)

४ सप्टेंबर अर्थात आजपासून स्टार प्रवाह परिवारात दाखल होतेय नवी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’. स्टार प्रवाहच्या प्रत्येक मालिकेतून नातेसंबंधांवर भाष्य केलं जातं. प्रेमाची गोष्ट ही मालिका देखील नात्यांची गुंफण असेल. चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विभिन्न स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात आणि त्यांच्यातलं प्रेम कसं बहरत जातं; हे सांगणारी सुंदर, तरल कथा म्हणजे प्रेमाची गोष्ट. या मालिकेत सागर म्हणजेच राज हंचनाळेच्या आईची भूमिका साकारणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री संजीवनी जाधव. नाटक आणि मालिकांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. प्रेमाची गोष्ट मालिकेतील त्या साकारत असलेली भूमिका नक्कीच वेगळी आहे.

प्रेमाची गोष्ट मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना संजीवनी जाधव म्हणाल्या, ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. प्रेमाची गोष्टच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आला आहे. या मालिकेत मी इंद्रा कोळी ही व्यक्तिरेखा साकारते आहे. कोळी व्यक्तिरेखा साकारायला मला प्रचंड आवडतं. कोळी पेहराव, त्यांची जीवनशैली माझ्या अतिशय आवडीची आहे. या मालिकेतही माझ्या पेहरावावर विशेष मेहनत घेतली गेलीय. पारंपरिक कोळी पद्धतीची साडी, दागिने हे इंद्राचं व्यक्तिमत्व आणखी खुलवतात.

इंद्रा ही आक्रमक विचारांची असली तरी मनाने अतिशय हळवी आहे. तिचं तिच्या मुलावर आणि नातीवर प्रचंड प्रेम आहे. इंद्रा हे पात्र मी फक्त साकारत नाहीय तर ते जगते आहे. मालिकेची टीम खूपच छान आहे. एकवीरा देवीच्या आशीर्वादाने आणि तुम्हा प्रेक्षकांच्या साथीने या मालिकेला भरभरुन यश मिळो ही प्रार्थना.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/