Close

संकर्षण सोबत लग्न करण्याची इच्छा पण आईने…. अभिनेत्याची चाहतीसाठी खास पोस्ट ( Sankarshan Karhade Share Post For His Fan, Who Wants To Marry Him)

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नुकताच त्याने त्याला साताऱ्याला आलेला त्याच्या खास चाहतीचा अनुभव शेअर केला आहे. संकर्षण त्याच्या नाटक आणि कवितेसाठी ओळखला जातो. त्यामुळे नाट्य आणि संगीतप्रेमी त्याच्यावर जीव ओवाळतात. नुकताच त्याला असाच एक गोड अनुभव आला होता. जो त्याने साोशल मीडियावर शेअर केला आहे.

काल साताऱ्या मध्ये प्रयोगानंतर एक मॅडम भेटल्या त्यांच्याविषयी थोडं शेअर करतोय ..! वेळ असेल तर वाचा ..!😊
त्यांनी म्हणे १२ वर्षांपूर्वी टेलिव्हिजन वरती माझं काम पाहिलं आणि घरी आईला सांगीतलं कि मला संकर्षण सोबतच लग्नं करायचंय.. त्यावर बारावीतल्या त्या पोरीला आई म्हणाली ;
“अभ्यास करा….”
पुढे त्यांचं शिक्षण झालं , लग्नं झालं , दीड वर्षांचा त्यांना मुलगा आहे.. आणि आता त्या सातारा मध्ये असतात.
काल प्रयोगाच्या निमित्ताने त्या आवर्जून मला भेटल्या..
त्यांचा नवरा त्यांना स्वतः असं म्हणाला कि , बाळ झोपलं असेल तर नक्की भेटून ये जा.. आणि आमची भेट झाली आणि त्यांनी मला हे सग्गळं स्वतः सांगीतलं… दीड वर्षांच्या झोपलेल्या बाळाला घरी ठेउन अगदी साध्या वेशात आलेली ती आई मला हे सगळं सांगुन गेली.
कित्ती गोड आहे यार हे
प्रेक्षक आणि कलाकार ह्यांच्या अनेक वर्षं एकत्रं होणाऱ्या ह्या प्रवासाचंही मला कौतुक वाटलं…. त्यांना मला हे मनमोकळेपणाने सांगावं वाटलं ह्या भावनांचंही मला फार फार कौतुक वाटलं .. आणि बाळ झोपलं असेल तर त्यांना भेटून ये , बोल .. हे म्हणनाऱ्या त्यांच्या नवऱ्याच्या समजुतदारपणाचंही मला खूपच कौतुक वाटलं.. माझ्या नावावरुन त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव पण विष्णूचं ठेवलंय हे तर काहीच्या काही मस्तं वाटलं ….
प्रेक्षकहो .. असंच प्रेम करत रहा .. भेटत रहा …. मी जबाबदारीने काम करीन
(त्यांचं नाव , फोटो मुद्दाम टाकला नाही पण पोस्टं मात्रं त्यांच्या परवानगीनेच करतोय!)

Share this article