बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीला एंडोमेट्रिओसिस नावाचा आजार जडला होता, त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सोशल मीडियावर तिने ही माहिती दिली. शमिताने हा व्हिडिओ तिच्या हॉस्पिटलमधून शेअर केला आहे. ज्यामध्ये ती लोकांना गुगल करून हा आजार काय आहे आणि किती वेदनादायक आहे हे शोधून काढायला सांगत आहे.
व्हिडिओमध्ये शमिता शेट्टी म्हणाली, 'ज्या महिला हा पाहत आहेत, त्यांनी जा आणि एंडोमेट्रिओसिस गुगल करा. ही समस्या काय आहे हे तुम्हाला माहित असल पाहिजे. हे खूप वेदनादायक आहे आणि खूप त्रास होतो. जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरात कोणत्याही कारणास्तव वेदना होतात तेव्हा तुमच्या शरीराचे ऐका. सकारात्मकतेने घ्या. दुर्लक्ष करू नका.
व्हिडिओ शेअर करताना शमिता शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुम्हाला माहित आहे का की जवळपास ४०% महिलांना एंडोमेट्रिओसिस आहे... आणि आपल्यापैकी बहुतेकांना या आजाराची माहिती नाही! मला माझ्या दोन्ही डॉक्टरांचे आभार मानायचे आहेत. माझ्या वेदनांचे खरे कारण सापडेपर्यंत त्यांनी त्यांचे संशोधन थांबवले नाही.
शस्त्रक्रियेद्वारे हा आजार माझ्यापासून दूर झाला आहे. आणि आता मला चांगले आरोग्य आणि जलद शारीरिक पुनर्प्राप्तीची आशा आहे. शमिताच्या या पोस्टवर उमर रियाझने लिहिले की, 'शमिताला पूर्णपणे रिकव्हर करा.' कृष्णा अभिषेकने लिहिले- लवकर बरी हो. बिपाशा बसू म्हणाली, स्वतःची काळजी घे आणि लवकर बरे हो. दिया मिर्झानेही प्रेमाचा वर्षाव केला