बॉलिवूड अभिनेता संजय कपूर आज 61 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची लाडकी मुलगी शनाया कपूर, पत्नी महीप कपूर, सोनम कपूर आणि मलायका अरोरा व त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शनाया कपूरने तिचे वडील संजय कपूर यांच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
बॉलीवूड अभिनेता संजय कपूर 17 ऑक्टोबर रोजी त्याचा 61 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची मुलगी शनाया कपूर आणि पत्नी महीप कपूर यांनी सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मलायका अरोरा आणि सोनम कपूर यांनीही सोशल मीडियावर अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
संजय कपूरची मुलगी शनाया कपूरने सोशल मीडियावर तिच्या वडिलांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या फोटोंची झलक दाखवली आहे. त्यात दोघेही बापलेक मजा करताना दिसत आहेत.
एका फोटोत संजय कपूरवाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर सेलिब्रेशनचे फोटो शेअर करताना शनायाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "हॅपी बर्थडे डॅड, लव्ह यू!"
संजय कपूरची पत्नी महीप कपूरने आपल्या पतीवर त्याच्या खास दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रेमाचा वर्षाव केला आहे. इंटरनेटवर स्वतःचा आणि नवरा संजय यांचा एक सुंदर फोटो शेअर करताना महीपने कॅप्शनमध्ये लिहिले - वाढदिवसाच्या शुभेच्छा हसबंड असे लिहिले आहे.
संजय कपूरची भाची सोनमनेही तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनम आणि तिचा काका संजय दिसत आहेत. काका संजय कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोनमने कॅप्शनमध्ये लिहिले - वाढदिवसाच्या शुभेच्छा संजय चाचू!!! बघ मला काय सापडलं असे लिहिले आहे!"
मलायका अरोरानेही तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.