Close

सिद्धार्थ जाधवच्या आवाजातील ‘नवरा माझा नवसाचा 2’ मधील भारुडाचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Siddharth Jadhav Perform Bharud In Navra Majha Navsacha2)

अभिनेते सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर स्टारर ‘नवरा माझा नवसाचा 2’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. काल २० सप्टेंबर रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल झाला. सध्या सर्वत्र ‘नवरा माझा नवसाचा 2’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. तब्बल २० वर्षानंतर या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस आला असून, सिनेमातील एका भारुडानं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिनेमात अभिनेता सिद्धार्ध जाधव याने सादर केलेल्या भारुडाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सिनेमात सिद्धार्थ जाधव याने एका राजकारणी व्यक्तीची भूमिका साकारली आहे. रेल्वेमध्ये प्रवास करत असताना सिद्धार्थ गणरायाकडे साकडं घालताना दिसत आहे. अशात सिद्धार्थ गणरायाला साकडं घालतोय की धमती देतोय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

https://youtu.be/hp-LytU_Tn0?si=NmoSXA1MSFY2br7V

‘सत्ताधारी खासदारकी लाभली मला मुकूट घालीन ५० खोक्यांचा तुला…’ असं सिद्धार्थ गणरायाकडे नवस बोलतो… यावर स्वप्नील जोशी ‘हे नवस बोलत आहेत की लाच देत आहेत…’ असा प्रश्न स्वप्नील जोशीला पडतो. विरोधी पक्षावर निशाणा साधत सिद्धार्थ म्हणतो, ‘जनतेचं भलं करायला, विरोधी पक्ष फोडायला बुद्धी दे आम्हाला…’, सिद्धार्थ जाधव याने सादर केलेलं भारुड सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भारुडातून अत्यंत समर्पकतेने समाजाचं प्रबोधन केलं आहे.

Share this article