Close

वजन वजन घटवण्याचे 10 सोपे उपाय (Simple Tricks To Loose Weight)

वजन कमी करण्यासाठी आहार कमी करण्याची गरज नाही. नेहमीच्या खाण्याच्या पदार्थांचा इतर काही पदार्थांशी संयोग केला, तर वजन कमी होण्यास मदत होते. पाहूया वजन कमी करण्याचे असे 10 सोपे उपाय…
जन वाढण्याच्या समस्येवर उपाय काय? असं विचारलं किंवा न विचारलं तरी लोक डाएट कमी करण्याचा सल्ला देतात. काही आहारतज्ज्ञ तर सांगतात की, डाएट कमी करण्याची आवश्यकता नाही. पण संतुलित आहार घ्या. आम्ही असं शोधून काढलं आहे की, नेहमी खाण्याच्या पदार्थांचा जर इतर काही पदार्थांशी संयोग केला तर वजन कमी होण्यास मदत होते…

  1. एक सफरचंद आणि अर्धा कप अक्रोड यांचे सॅलड बनवा आणि ते दररोज खा. सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, तर अक्रोडात ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते. वजन कमी करण्यासाठी हा संयोग म्हणजे बिनतोड मानला जातो.
  2. एक वाटी दह्यात 4 स्ट्रॉबेरीज् टाका, अन् हे मिश्रण खा. स्ट्रॉबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. वजन कमी करण्यासाठी ते मदत करतात.
  3. उकडलेल्या अंड्यावर काळी मिरी पावडर टाकून खा. अंड्यामधील प्रोटिन्स आणि काळ्या मिरीत असलेले क-जीवनसत्त्व यांच्या संयोगाने वजन कमी होते.
  4. केळी आणि पालक यांना एकत्र करून खाल्ल्यास शरीरात जमलेले फॅट्स चांगल्यापैकी बर्न होतात.
  5. एक वाटी दह्यात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळा आणि हे मिश्रण खा. शरीरातील फॅट्स बर्न करण्यात हे कॉम्बिनेशन उपयुक्त ठरते.
  6. अशीच चिमूटभर दालचिनी पावडर कॉफीमध्ये टाकून प्यायल्यास वजन बर्‍यापैकी कमी होते. दालचिनीत असलेले अ‍ॅन्टी ऑक्सिडंट्स शरीरातील इन्सुलीनचे प्रमाण नियंत्रित ठेवते. त्यामुळे वजन कमी होते.
  7. काही लोकांना सफरचंद खाण्याचा कंटाळा येतो. अशा लोकांनी सफरचंदाचे तुकडे करावेत. अन् हे तुकडे वितळवलेल्या चॉकलेटमध्ये घालून खावेत. चव चांगली लागेल आणि वजनही कमी होईल.
  8. फरसबी आपले वजन कमी करण्यास मदतगार ठरते. ह्या फरसबीचे तुकडे करून, त्यामध्ये मक्याच्या कणसाचे दाणे मिसळा. अन् हे कॉम्बिनेशन खा. फरसबीचे गुण आणि मक्याच्या दाण्यामध्ये असलेल्या कर्बोदिकांचे मिश्रण झाले की, वजन चांगलेच कमी होईल.
  9. दुधाचा चहा पिण्यापेक्षा बिनदुधाचा चहा प्या. त्यातही ग्रीन-टी सर्वोत्तम. या ग्रीन टी मध्ये लिंबू पिळून प्या. हा वजन कमी करण्याचा अगदी साधा, सोपा उपाय आहे.
  10. आपण रोजच्या भाज्यांमध्ये हळद टाकतोच. तिच्या सोबत काळी मिरी पावडर टाका. या मिश्रणाने वजन कमी होण्यास मदत होईल.

Share this article