मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी सिन्हा 23 जूनला तिचा लाँग टाइम बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न करणार आहे. लग्नानंतर त्याच दिवशी संध्याकाळी एक छोटीशी रिसेप्शन पार्टी होईल. मात्र अद्याप या जोडप्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षी आणि झहीर इक्बाल 23 जून रोजी मुंबईत लग्न करणार आहेत. पण लव्ह बर्ड्सनी या बातमीला अजून दुजोरा दिलेला नाही.
अलीकडेच आणखी एका नवीन अहवालात असे समोर आले आहे की सोनाक्षी सिन्हा आणि झहीर 23 जून रोजी नोंदणीकृत विवाह करणार आहेत. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी रिसेप्शन पार्टी होईल, ज्यामध्ये कपलचे मित्र सहभागी होतील.
सोनाक्षीच्या एका जवळच्या मैत्रिणीने सांगितले की, मलाही 23 जूनच्या संध्याकाळी या जोडप्यासोबत सेलिब्रेट करण्याचे आमंत्रण मिळाले आहे. पण निमंत्रण पत्रिकेत खऱ्या लग्नाबद्दल काहीही लिहिलेले नाही. तसेच त्याच्या लग्नाच्या निमंत्रणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.
माहितीप्रमाणे या जोडप्याने आधीच त्यांच्या लग्नाची नोंदणी केली आहे. तसे नसल्यास ते 23 जून रोजी सकाळी करू शकतात. हे लग्न फार धूमधडाक्यात होणार नाही, फक्त पार्टी असेल.
मात्र आतापर्यंत सोनाक्षी सिन्हा आणि झहीरच्या लग्नाबाबत फारशी माहिती मिळालेली नाही.