Close

रिअल मायलेकींची रिल स्टोरी, मायलेक चित्रपटाचा टीझर प्रदर्शित (Sonali Khare Daughter Debut)

सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची हवा पाहायला मिळते. सुहाना खान, खुशी कपूर, सारा अली खान, जान्हवी कपूर, आगस्त्य नंदा, न्यासा देवगण, पलक तिवारी, इब्राहिम अली खान हे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. अशातच आता एका मराठमोळ्या स्टारकिडचे पदार्पण होणार आहे. ही स्टारकिड आईसोबतच स्क्रीन शेअर करणार असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्री सोनाली खरेची मुलगी आता मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव 'मायलेक' असे आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

आई मुलीचे नाते हे सर्वात जवळचे, खास असते. कधी त्या घनिष्ट मैत्रिणी असतात, तर कधीकधी त्यांच्यात रुसवे फुगवेही असतात. त्यातही मजा असते. याच गोड नात्याची गोष्ट सांगणारा 'मायलेक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्यातील सुदृढ नाते या टीझरमध्ये दिसत आहे. यात आईला जितके मुलीचे कौतुक आहे, तितकेच कौतुक, विश्वास मुलीलाही तिच्या आईबद्दल आहे. या चित्रपटात उमेश कामतही प्रमुख भूमिकेत आहे.

येत्या १९ एप्रिल रोजी माय लेकीची ही गोड कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत या चित्रपटाच्या प्रियांका तन्वर दिग्दर्शिका आहेत. तर या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने, महेश पटवर्धन, वंश अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रिअलमधील मायलेक रीलमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे निर्माते असून नितीन प्रकाश वैद्य असोसिएट प्रोड्यूसर आहेत.

सोनाली खरेने मुलीसोबत काम करतानाचा अनुभव शेअर केला आहे. ती म्हणाली, "आई मुलीच्या सुंदर नात्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यात प्रेमासोबत काही आंबट गोड क्षणही आहेत. प्रत्येक आईमुलीला हा चित्रपट जवळचा वाटेल. मुळात आम्ही खऱ्या मायलेकी असल्याने हे पडद्यावर खूप नैसर्गिकरित्या साकारता आले."

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/