सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये या जोडप्यासोबत त्यांचा लहान मुलगा वायुही दिसत आहे. हे फोटो लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमचे आहेत, तिथे हे कपल सहकुटुंब सहपरिवार फिरायला गेले आहेत.
आनंद आणि सोनमच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या फोटोत, वायू उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि आनंद मुलाला धरून बसले आहेत. वायु फक्त 10 महिन्यांचा आहे. पुढच्या फोटोमध्ये सोनम आनंदजवळ बसलेली आहे आणि आनंदने वायूला आपल्या मांडीवर घेतले आहे.
या फोटोंमध्ये हे जोडपे काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. तर व्हाइट प्रिंटेड आउटफिटमध्ये वायुचा लूक खूपच क्यूट दिसत आहे. संपूर्ण कुटुंबाची छायाचित्रे मागून घेण्यात आली आहेत. कोणाचाच चेहरा दिसत नाही. हे फोटो शेअर करत आनंदने कॅप्शन लिहिले- 'मला कोचच्या आत घेऊन जा! मी तयार आहे #VayusParents #EverydayPhenomenal.
शेअर केल्यानंतर हे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. फॅमिली आउटिंगच्या या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. वायूच्या बालपणीच्या आठवणींना संस्मरणीय बनवल्याबद्दल यूजर्स आणि सेलेब्स या जोडप्याचे कौतुक करत आहेत. या फोटोंवर कमेंट करताना वायुची आजी सुनीता कपूर यांनी लिहिले- माय एंजल! यासोबतच हार्ट इमोजीही बनवण्यात आले आहेत. आनंद आहुजाची आई प्रिया आहुजानेही या फोटोंवर प्रेम लिहून आपले प्रेम दाखवले.