Close

आठ वर्षानंतर सलमान आणि सूरज बडजात्या त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी एकत्र येणार (Sooraj Barjatya confirms film with Salman Khan to begin next year)

सुरज बडजात्या यांच्या मैंने प्यार किया, हम साथ साथ है, हम आपके हैं कौन, प्रेम रतन धन पायो यासारख्या चित्रपटांतील सलमानचं प्रेम नावाचं कॅरेक्टर चाहत्यांच्या मनात घर करुन गेलं होतं. आता सलमान पुन्हा एकदा सूरज बडजात्या यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले आहे. सलमाननं त्याच्या आतापर्यंतच्या बॉलीवूड प्रवासात अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. मात्र बडजात्या यांच्यासोबतची त्याची केमिस्ट्री काही वेगळीच होती. त्यांच्या चित्रपटातील भूमिका चाहत्यांना कमालीच्या आवडल्या होत्या.

सलमान आणि सूरज बडजात्या यांच्या जोडीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्या जोडीनं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. सलमानचा पहिला चित्रपट मैंने प्यार किया त्याची निमिर्ती आणि दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केलं होतं. त्या चित्रपटानं सलमानच्या रुपानं बॉलीवूडला मोठा स्टार मिळाला होता. आता हे दोघे आठ वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

बॉलीवूडमधील सर्वाधिक यशस्वी जोडी म्हणून नेहमीच सलमान खान आणि सूरज बडजात्या यांच्याकडे पाहिले गेले आहे. त्यांच्या कमबॅकनंतर आता चाहत्यांना त्यांच्या आगामी प्रोजेक्टचे वेध लागले आहेत. त्या दोघांची एकत्रित ही पाचवी फिल्म असणार आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट प्रेम रतन धन पायो हा होता. जो २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता.

प्रेम की शादी असे या नव्या प्रोजेक्टचे नाव असून अद्याप त्याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र त्यात सलमान दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. हा चित्रपट फ्लोअरवर येण्यापूर्वीच त्यावरुन काही वेगळ्या गोष्टी घडल्याचीही चर्चा आहे. त्यात सलमानची एंट्री होणार हीच त्याच्या चाहत्यांसाठी समाधानाची आणि आनंदाची गोष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.

(फोटो सौजन्य – सोशल मिडिया)

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/