कॉमेडीचा बादशाह कपिल शर्माचा शो 'द कपिल शर्मा शो' चे चाहते असंख्या आहे. आहेत. कपिलच्या शोचा पहिला सीझन 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या नावाने ओळखला जात होता. त्यातील सर्व विनोदी कलाकार प्रेक्षकांमध्ये सुपरहिट ठरले होते. पहिल्या सीझनमधील 'बाबा जी का ठुल्लू' किंवा 'इत्तू सा था...' सारखे डायलॉग्सही कॉपी केले जात होते. त्याच वेळी, कपिल त्याची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्तीची 'तिचे ओठ बदकासारखे आहेत' असे सांगून खिल्ली उडवत असे.
कपिलच्या या डायलॉगवर प्रेक्षकांनाही जोरजोरात हसायला भाग पाडलं, पण या विनोदामुळे अभिनेत्रीचं काय झालं याचा कुणी विचार केला नाही. आता अभिनेत्रीने तिच्या वेदनांबद्दल सांगितले आहे की जेव्हा तिच्या ओठांची खिल्ली उडवली गेली होती.
सुमोना चक्रवर्तीने नुकताच खुलासा केला की, जेव्हा तिचे ओठ बदकासारखे आहेत असे बोलून तिची खिल्ली उडवली जात असे तेव्हा तिला काय त्रास व्हायचा. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा कपिल शर्मा तिच्या ओठांची खिल्ली उडवत असे तेव्हा तिला खूप वाईट वाटायचे. तिला खूप अस्वस्थ वाटायचे पण तेव्हा अर्चना पूरण सिंहने तिला समजावले होते.
कपिल शर्मा सध्या भारतात नसून तो त्याच्या टीमसोबत अमेरिका दौऱ्यावर आहे. रिपोर्ट्सनुसार, या टूरवरून परतल्यानंतर कपिल शर्मा त्याच्या शोचा नवीन सीझन सुरू करणार आहे. मात्र, यावेळी कृष्णा अभिषेक कपिल शर्मासोबत टूरवर गेलेला नाही.
'द कपिल शर्मा शो'मध्ये सुमोना चक्रवर्ती कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे. तिने अलीकडेच सांगितले की, जेव्हा तिच्या ओठांसाठी तिची खिल्ली उडवली गेली तेव्हा तिला खूप अस्वस्थ वाटू लागले होते. तिने ओठांवर लिपस्टिक लावणेही सोडून दिले.
एका मुलाखतीत सुमोनाने सांगितले की, शोच्या पहिल्या सीझनमध्ये तिच्या चेहऱ्याची खिल्ली उडवली गेली होती, पण लोक त्यावर हसले नाहीत, पण दुसऱ्या सीझनमध्ये जेव्हा या जोकवर प्रेक्षक हसायला लागले, तेव्हा प्रत्येक व्यक्तीने या शोमध्ये हसायला सुरुवात केली. तिचे ओठ आणि तोंडावरुन पाहुण्यासमोर चेष्टा करण्यात आली. शोमध्ये कपिल शर्मा अनेकदा 'बदक जैसे होंठ है इसके' म्हणत तिची खिल्ली उडवत असे, त्यामुळे ती खूप दुःखी होती.
कपिलने शोमध्ये तिची खिल्ली उडवली असली तरी सेटवर तो तिची स्तुती करत असे. असे सांगितले जाते की जेव्हा सुमोनाला वाईट वाटू लागले तेव्हा अर्चना पूरण सिंहने तिला समजावून सांगितले की जर तुम्ही स्वतःवर हसत असाल तर तुम्हाला कधीही लाज वाटणार नाही.