रामायण' मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
सुनील लहरींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे. सुनील लहरी यांनी लक्ष्मणाची ओळख पुसत चालल्याची भीती व्यक्त केली आहे.
सुनील लहरी यांनी लिहिले की, 'राम-सीतेचे नाव सर्वत्र आहे. लक्ष्मणाचीही कोणीतरी तशीच आठवण काढली पाहिजे होती.... सीतामातेवरुन सीताफळ आहे, त्याचप्रमाणे प्रभू रामावरुन रामफळ आहे. लक्ष्मण फळ म्हणता येईल असे एखादे फळ असायला हवे होते. असो, यावेळी संपूर्ण भारत राममय झाला आहे. इतकंच नाही तर व्हिडीओमध्ये सुनील लहिरींनी रामफळ दाखवत त्याचे उपयोग देखील दाखवले. ते फळ त्यांनी पहिल्यांदाच चाखले, त्याची चव थोडी आंबट आणि गोड असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी असतात. त्यामुळे हे फळ सर्वांनी खाल्ले पाहिजे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे ते म्हणाले.