Close

हुबेहूब सुशांत सारख्या दिसणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल; राखी सावंत म्हणाली, ‘बदला घेण्यासाठी तो परत आला…’ (Sushant Singh Rajput Duplicate Donim Ayaan Video Viral On Social Media)

बॉलिवूडचा दिंवगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा या जगात नाही. त्याने २०२० मध्ये त्याच्या वांद्रे येथील घरी आत्महत्या केली. तो जाऊन तीन वर्षं झाली असली तरी त्याच्या चाहत्यांच्या मनात त्याचे स्थान अजूनही कायम आहे. एका टिव्ही शो मध्ये काम करत करियची सुरुवात करणारा सुशांत बॉलिवूडचा टॉप अभिनेता बनला होता. आज देखील चाहते सुशांत सिंह राजपूत याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओचा संबंध सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत असल्याचं दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. कारण त्या व्हिडिओमधील व्यक्ती हुबेहूब सुशांत सारखीच दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. तो सुशांतच असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. त्या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ओमायगॉड सेम टू सेम।’, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘हा हुबेहूब सुशांतसारखा दिसत आहे..’ फक्त नेटकरी नाही तर, बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत हिने देखील सदर व्हायरल व्हिडीओवर कमेंट केली आहे. ‘बदला घेण्यासाठी तो परत आला…’ असं राखी कमेंट करत म्हणाली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर राखीने वारंवार त्याच्यासाठी न्यायाची मागणी केली होती. ती आजही सुशांतला मिस करते. तिच्या बऱ्याच व्हिडीओतही ती सुशांतबद्दल बोलली आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी सुशांत सिंग राजपूतच्या लूक लाइकचा एक व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला असून आता या व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती पाहिल्यानंतर राखीला देखील तो सुशांतच असल्याचा भास झाला.

पण सुशांतच्या या लुकलाइकचे नाव डोनिम अयान असे आहे आणि तो सुशांतसारखाच दिसतो. काही व्हिडिओंमध्ये अयान हुबेहुब सुशांतसारखा दिसत आहे. सुशांतची स्माईल आणि हेअरस्टाईल पाहून कोणीही फसू शकतं. इंस्टाग्रामवर या मुलाचा व्हिडिओ पाहून सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

Share this article