Close

लाइव्ह सेशनद्वारे सुष्मिता सेनने साधला चाहत्यांशी संवाद, सोतच दिली तब्येत आणि आर्या ३ ची माहिती (Sushmita Sen Says ‘Health Is Fabulous’ As She Shares Update With Fans, also gives Exciting Details About Aarya 3)

सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसह एक लाईव्ह सेशन आयोजित केले होते. या संवादादरम्यान, अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना तिच्या प्रकृतीबद्दल सांगितले, तसेच अभिनेत्रीने तिच्या आगामी आर्या 3 सीरिजबद्दलही चाहत्यांना अनेक रोमांचक माहिती दिली.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची वेब सीरिज आर्या 3 येणार आहे. त्यामुळे अभिनेत्री चर्चेत आहे. याशिवाय अभिनेत्री नुकतीच इन्स्टाग्रामवर लाइव्ह आलेली, तेव्हा सुष्मिता सेनने तिच्या आगामी वेब सीरिज आर्या 3 बद्दल सांगितले. आणि यासोबतच अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना तिच्या हेल्थची अपडेटही दिली.

इंस्टाग्राम लाइव्ह सेशनदरम्यान, चाहत्यांनी अभिनेत्रीला तिच्या तब्येतीबद्दल विचारले. तर अभिनेत्री उत्तरात म्हणाली- माझी तब्येत एकदम ठीक आहे. देवाच्या कृपेने मी चांगला आहार घेत आहे.

अभिनेत्रीने तिच्या आगामी वेबसिरीज आर्या 3 बद्दल चाहत्यांना अपडेट दिली. अभिनेत्री म्हणाली- मी देखील आर्या 3 ची आतुरतेने वाट पाहत आहे. मला वाटते की हा सीझन खूप चांगला होणार आहे. या वेब सीरिजबद्दल मला तुम्हाला खूप काही सांगायचे आहे. आरोग्याच्या भीतीपासून ते कृतीपर्यंत - आम्ही यामध्ये बरेच काही केले आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा सीझन इतर सीझनप्रमाणे आवडेल.

इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशनचा व्हिडिओ पोस्ट करताना, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले - मला तुमची खूप आठवण येते... तुम्ही माझ्या आयुष्यात आणलेल्या सर्व चांगुलपणासाठी मी तुमच्यावर प्रेम करते... नेहमी!!! #yourstruly #duggadugga.

सुष्मिता सेनला काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. वडिलांसोबतचा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने हृदयविकाराच्या झटक्याची माहिती दिली होती.

Share this article