Close

‘बॉईज ४’ चा चौपट धमाका : पोस्टर नंतर टिझर प्रदर्शित(Teaser Of New Marathi Film ‘Boys 4’ Released)

विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ४’ या चित्रपटाचे भन्नाट  टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या कलाकारांचे पोस्टर झळकले होते. यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे एकंदरच ही सगळी मंडळी कल्ला करणार हे निश्चित!

बॅाईज, बॅाईज २ आणि बॅाईज ३ मधील धैर्या, ढुंग्या आणि कबीरची मैत्री आपल्या सर्वांनाच माहीत आहे. या मैत्रीने अवघ्या महाराष्ट्रात धुमाकुळ घातला होता. मात्र टिझरमध्ये त्यांच्या या मैत्रीत आता दरार आल्याचे दिसत आहे. आता ही मैत्री संपुष्टात येणार की त्यांची ही गॅंग आणखी वाढणार, याचे उत्तर प्रेक्षकांना येत्या २० ऑक्टोबरला मिळणार आहे. एवढे मात्र नक्की की हे अफलातून कलाकार यंदा तुफान धिंगाणा घालणार आहेत.

दिग्दर्शक विशाल देवरूखकर म्हणतात, ‘’ या त्रिकुटाच्या मैत्रीची सुरूवात, चांगल्या, वाईट प्रसंगी एकमेकांना दिलेली साथ, थट्टामस्करी यापूर्वीच्या तीन भागांमध्ये सर्वांनी पाहिलेली आहे. मात्र आता या मैत्रीत ट्विस्ट येणार आहे. ’बॉईज’ च्या प्रत्येक भागाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. चित्रपटातील कलाकार जरी तेच असले तरी प्रत्येक वेळी आम्ही प्रेक्षकांसाठी कथेत नवनवीन वळणे आणली. यावेळीही असेच सरप्राईज आहे. त्यात आता आणखी जबरदस्त कलाकार सामील झाले आहेत. त्यामुळे आता ही धमाल चौपट झाली आहे. ‘’

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/