Close

तेजश्री प्रधानचा ‘ओली की सुकी’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर (Tejashree Pradhans ‘Oli Suki’ Movie On Ott)

प्रत्येक नवा दिवस आपल्यासोबत एक नवीन संधी घेऊन येतो, अशाच एका प्रेरणादायी विषयावर आधारित 'ओली की सुकी' चित्रपट ४ जानेवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ‘आनंद दिलीप गोखले’ यांनी केले असून चित्रपटात तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, शर्वरी लोहकरे, संजय खापरे, सुहास शिरसाट आणि वर्षा उसगांवकर हे सुप्रसिद्ध अभिनेते दिसणार आहेत.

चित्रपटाची कथा झोपडपट्टी आणि त्यातील आयुष्यात भरकटलेल्या मुलांभोवती फिरते. झोपडपट्टीतील टुकार मुलांच्या दोन गटांत नेहमी विनाकारण भांडणे होत राहतात. ही मुले वाईट वळणांच्या एवढ्या अधीन जातात की चोरी करण्यापर्यंत यांचे विचार पोहचतात. पण त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात राधिकाताई येते, जी त्यांच्या संपूर्ण जीवनाला एक वेगळंच वळण देते. राधिकाताईने नेमकी अशी कोणती जादू या मुलांवर केली ते चित्रपटात पहायला मिळणार आहे.

https://youtu.be/Cxoe1ovQo7o?si=3V_V-FTjUK79aYIG

आयुष्यात अनेक अडचणी येतात पण आपण त्यांना सामोरे जाऊन यशाच्या दिशेने अविरत चालत रहायला हवं. अशा आशयाचा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.

Share this article