मौनी रॉय आणि दिशा पटानी सध्या बी टाऊनची लोकप्रिय जोडी आहेत. दोघंही अनेकदा इव्हेंट्स, पार्टी आणि डिनरमध्ये एकत्र दिसतात. दोघेही नेहमीच हात हातात धरुन फिरत असतात. आणि आता ते थायलंडमध्ये एकत्र व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत.
मौनी आणि दिशा त्यांच्या इंस्टा स्टोरीजवर त्यांच्या व्हेकेशनचे हॉट फोटो पोस्ट करत आहेत आणि दररोज बीच फॅशन गोल देत आहेत.
मौनीने पहिल्या दिवशी शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती आणि दिशा बीचवर थंडीच्या गुलाबी मौसमात पोझ देत होत्या. मौनीने ब्राऊन बॉडीकॉन हाय स्लिट ड्रेस घातलेला तर दिशा लाल बिकिनीमध्ये अंगार दिसत होती. मौनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- माझ्या आवडत्या मुलीसोबत सुट्टी.
ताज्या फोटोंमध्ये मौनी आणि दिशा आणखीच मस्त दिसत आहेत. दोघेही पांढऱ्या रंगाचे मॅचिंग कपडे घालून समुद्रकिनारी सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसले.
चाहते कमेंट करून त्यांचे कौतुकही करत आहेत आणि काहीजण त्यांना ट्रोल करत आहेत, तुम्ही दोघे डेट करत आहात का… तुम्ही याची अधिकृत घोषणा कधी करणार? काही त्यांना लेस्बियन म्हटले आहेत तर काही त्यांना हॉट बिचेस म्हणत आहेत.