बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने तिच्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. माधुरी दीक्षित आणि सलमान खानचा चित्रपट 'हम आपके है कौन' बॉक्स ऑफिसवर ब्लॉक बस्टर ठरला. या चित्रपटात रेणुका शहाणेने माधुरीच्या मोठ्या बहिणीची आणि सलमानच्या वहिनीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माधुरीने तिची ऑनस्क्रीन बहीण रेणुका शहाणे हिला जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला होता. अखेर यामागचे कारण काय, याचा खुलासा खुद्द रेणुका शहाणे यांनी एका मुलाखतीत केला आहे.
एका मुलाखतीत रेणुका शहाणे यांनी माधुरी दीक्षितच्या निरीक्षण कौशल्याबद्दल सांगितले होते. अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा 'हम आपके है कौन' चित्रपटाचे शूटिंग सुरू होते तेव्हा ती खूप कमी पाणी पीत होती आणि माधुरीच्या ही गोष्ट लक्षात आली, त्यानंतर तिने रेणुकाला जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला.
रेणुकाने सांगितले की शूटिंगच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ती जास्त पाणी पीत नव्हती, सेटवर वॉशरूम नसल्याने ती असे करत होती. वॉशरूम नसल्यामुळे रेणुका कमी पाणी पीत होत्या, पण जेव्हा माधुरीच्या हे लक्षात आले तेव्हा तिने रेणुकाला हायड्रेटेड राहण्याचा सल्ला दिला.
वॉशरूममध्ये अडचण असली तरी कमी पाणी पिऊ नको, असे माधुरीने मला सांगितले होते, असे अभिनेत्रीने सांगितले. कमी पाणी प्यायल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे कमी पाण्याऐवजी भरपूर पाणी पी असे ती म्हणालेली. माधुरीने तिला सांगितले की, हे जरी आऊटडोअर शूट असले तरी आम्ही चार महिलांना सोबत घेऊन त्याचे व्यवस्थापन करू.
रेणुकाने मुलाखतीत पुढे सांगितले की, आउटडोअर शूटिंगमध्ये कडक सूर्यप्रकाश असतो, अशा स्थितीत शरीरात पाण्याची कमतरता सामान्य गोष्ट होती. रेणुका म्हणते की, माधुरीचा हा सल्ला ऐकून मला खूप आश्चर्य वाटले, कारण तिचे निरीक्षण खूप मजबूत होते. अभिनेत्रीने सांगितले होते की शूटिंगचे पहिले दोन दिवस तिने सेटवर पाणी प्यायले नाही आणि शूटिंग संपल्यानंतर ती हॉटेलमध्ये जाऊन पाणी प्यायची.
विशेष म्हणजे 'हम आपके है कौन' हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांचा ऑल टाईम फेव्हरेट आहे. हा चित्रपट केवळ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही तर त्यातील सर्व कलाकारांनाही भरभरून प्रेम मिळाले. माधुरी, सलमान आणि रेणुका शहाणे यांच्याशिवाय मोहनीश बहल, अनुपम खेर, आलोक नाथ, रीमा लागू असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.