बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.'कहो ना प्यार है' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या हृतिकने आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांपैकी एक असलेल्या हृतिकच्या स्टाइलचे सर्वांनाच वेड लागले आहे, त्याला बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' देखील म्हटले जाते.
या अभिनेत्याची चाहत्यांमध्ये खूप क्रेझ आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की एक काळ असा होता जेव्हा साऊथचा सुपरस्टार किच्चा सुदीप हृतिकचा तिरस्कार करू लागला होता. अभिनेत्याचा तिरस्कार करण्याचे कारण त्याची पत्नी असल्याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने केला होता.
साऊथ सिनेसृष्टीत अनेक शानदार आणि हिट चित्रपट देणाऱ्या सुपरस्टार किच्चा सुदीपला ओळखीची गरज नाही. एक वेळ अशी आली की अनेक चित्रपट देणारा किच्चा सुदीप बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनचा तिरस्कार करू लागला.
याचा खुलासा खुद्द किच्चा सुदीपने एका मुलाखतीत केला आहे. यामागचे सर्वात मोठे कारण त्याची स्वतःची पत्नी असल्याचे अभिनेत्याने सांगितले होते. तो म्हणालेला की त्याची पत्नी हृतिक रोशनची खूप मोठी फॅन आहे. 'कहो ना प्यार है' हा त्याचा डेब्यू चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पत्नीमुळे त्याला 10 वेळा हा चित्रपट पाहावा लागला होता.
किच्चा सुदीप पुढे म्हणाला की, जेव्हा मी हृतिकचा हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तेव्हा मला तो खूप आवडला, पण एकच चित्रपट १० वेळा कसा बघता येईल. मात्र, त्याच्या पत्नीने त्याला धमकी दिली होती की, जर तो तिच्यासोबत 'कहो ना प्यार है' चित्रपट पाहण्यासाठी गेला नाही तर ती दुसऱ्या कुणासोबत चित्रपट पाहायला जाईल.
अभिनेत्याने असेही सांगितले की जेव्हाही त्याची पत्नी हृतिकला पडद्यावर पाहिले तेव्हा ती इतकी उत्सुक झाली की तिने त्याच्या हातावर ठोसा मारण्यास सुरुवात केली. हृतिकची आवड आणि त्याच्या पत्नीच्या कृतीला कंटाळून किच्चा त्याचा तिरस्कार करू लागला.
किच्चाने करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले असले तरी, 'मक्खी' मधील दमदार भूमिकेसाठी तो आजही त्याच्या चाहत्यांच्या स्मरणात आहे. प्रभू देवाने दिग्दर्शित केलेल्या सलमान खानच्या 'दबंग 3' या चित्रपटात किच्चा सुदीप महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.