Close

अदा शर्माने विकत घेतले तेच घर जिथे सुशांत सिंह राजपूतने केलेली आत्महत्या (The Kerala Story Actress Adah Sharma Buys Sushant Singh Rajput’s flat)

'द केरला स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्माबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदा शर्माने अखेर तिचे मुंबईत घर विकत घेतले आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे अदा शर्माने जो फ्लॅट घेतला आहे तो तोच फ्लॅट आहे ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूत राहत होता. 2020 मध्ये सुशांतने याच फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. तेव्हापासून हा फ्लॅट रिकामा होता.

'द केरला स्टोरी'च्या सुपर यशानंतर अदा शर्माची कारकीर्द चांगलीच सुरू आहे. ती खूप दिवसांपासून तिचे घर शोधत होती आणि आता अखेर तिने तिचे घर घेतले आहे. अदा शर्माच्या टीमकडून बातमी मिळाली आहे की अदाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वांद्रे येथील मॉन्ट ब्लँक इमारतीत भाड्याचे घर घेतले आहे

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचे १४ जून २०२० रोजी निधन झाले. मुंबईतील त्या फ्लॅटमध्ये तो मृतावस्थेत आढळून आला. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर, तो फ्लॅट रिकामा होता, तो अनेकदा चर्चेत होता. अभिनेत्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी ते या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. तेव्हा सुशांत या फ्लॅटचे भाडे म्हणून साडेचार लाख रुपये देत असे. मात्र त्यांच्या निधनानंतर हा फ्लॅट बराच काळ रिकामा होता. त्याच्या मृत्यूनंतर या फ्लॅटला भाडेकरू मिळत नव्हते. त्या फ्लॅटमध्ये कोणीही जाण्यास किंवा राहण्यास तयार नव्हते. पण आता बातमी येत आहे की, दिवंगत अभिनेत्याचा हा फ्लॅट अदा शर्माने विकत घेतला आहे.

अदा शर्मा पूर्वी तिच्या टीम आणि ब्रोकरसोबत सुशांतच्या घरी जाताना दिसली होती आणि आता तिची डील फायनल झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तिने हे घर किती किमतीत विकत घेतले आहे, केव्हा खरेदी केले आहे आणि ती कधी शिफ्ट होणार आहेत, यासंबंधीची अन्य माहिती समोर आलेली नाही. तथापि, आज जेव्हा अदा शर्मा शहरात दिसली आणि आमच्या पापाराझींनी तिला या घराबद्दल विचारले तेव्हा तिने तेव्हा तिने माहिती देणे टाळले.

Share this article