कंगना राणौत तिच्या अभिनयासोबतच स्पष्ट बोलण्यासाठी ओळखली जाते. ती अनेकदा काही बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करत असते. त्यांच्याशी उघडपणे वादही घालते. त्यामुळेच तिला 'पंगा क्वीन'चा टॅगही देण्यात आला आहे. नुकताच तिने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाने त्यांना बनावट जोडपे म्हटले आहे.
कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर गूढ पोस्ट टाकल्या आहेत. ज्याद्वारे तिने थेट रणबीर आलियावर निशाणा साधला आहे. कंगनाने लिहिले, एक बनावट पती-पत्नीची जोडी जी वेगवेगळ्या मजल्यांवर राहते आणि जोडपे असल्याचे भासवते, चित्रपटाच्या घोषणांबद्दल खोट्या बातम्या पसरवत आहे, खरेतर तो चित्रपट बनतच नाही आहे. हे जोडपे मिंत्रा या ब्रँडला त्यांचा ब्रँड सांगतात. हे सर्व असूनही, नुकत्याच झालेल्या कौटुंबिक सहलीत पत्नी आणि मुलीला कसे बाजूला केले गेले याबद्दल कोणीही लिहिले नाही. तो सो कॉल्ड नवरा मला मेसेज करत होता आणि भेटण्याची विनंती करत होता. या खोट्या जोडप्याचा पर्दाफाश झाला पाहिजे."
दुसर्या पोस्टमध्ये कंगनाने लिहिले की, "जेव्हा लोक प्रेमासाठी नाही, तर चित्रपटाच्या प्रमोशन, काम आणि पैशासाठी लग्न करतात तेव्हा असे घडते. चित्रपट ट्रायोलॉजीचे वचन देणाऱ्या माफिया डॅडीच्या दबावाखाली अभिनेत्याने पापाच्या परीशी लग्न केले. आता त्याला या खोट्या लग्नातून सुटका हवी आहे, पण दुर्देव त्याला कोणी भाव देत नाही. आता त्याने आपल्या पत्नी आणि मुलीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा भारत आहे. एकदा लग्न झाले की, झाले. आता सुधारणा करा."
तिने तिच्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी ती कोणत्या दिशेने आणि कोणाबद्दल बोलत आहे हे तिच्या पोस्टवरून स्पष्ट होते.
कंगनाने रणबीरवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करून रणबीरला पांढरा उंदीर, वूम आणि ड्रगजिस्ट म्हटले होते.