Close

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सागर-मुक्ताच्या संगीत सोहळ्याला नामांकित कलाकारांची खास हजेरी (Top Serial Artists Participating In Big Fat Wedding Ceremony For The Lead Pair Of Serial ‘Premachi Gosht’)

स्टार प्रवाहच्या प्रेमाची गोष्ट मालिकेत सध्या मुक्ता सागरच्या लग्नाची धामधूम सुरु आहे.

सईवरच्या प्रेमाखातर सई-मुक्ताने लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. साखरपुडा आणि मेहंदी समारंभ थाटात पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती संगीत सोहळ्याची.

संगीत सोहळ्यात मन धागा धागा जोडते नवा, लग्नाची बेडी, अबोली आणि पिंकीचा विजय असो मालिकेतील कलाकार खास हजेरी लावणार आहेत. स्टार प्रवाह परिवारासोबतच मुक्ता आणि सागरचा खास परफॉर्मन्स देखिल पाहायला मिळणार आहे. चिमुकली सईही मी हाय कोळी गाण्यावर ठेका धरणार आहे.

Share this article