सोशल मीडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद, टीव्ही शोमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्फी जावेदला एकता कपूरच्या लव्ह, सेक्स और धोखा-2 या चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाल्याचे बोलले जात आहे.
अनेकदा उर्फी जावेदला तिच्या हास्यास्पद फॅशन सेन्समुळे ट्रोल केली जाती, परंतु सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार, अभिनेत्री लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. टीव्ही मालिका निर्माती आणि बालाजी प्रॉडक्शनची मालकीण एकता कपूर हिच्या लव्ह, सेक्स और धोखा-2 या चित्रपटात काम करण्याची संधी उर्फीला मिळाली आहे.
टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार उर्फीला एका चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीसाठी अप्रोच करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार - टीव्ही सीरियल निर्माती एकता कपूरच्या 'लव, सेक्स और धोखा-2' या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्रीशी संपर्क साधण्यात आला आहे. कारण ही भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री पूर्णपणे फिट आहे.
यासोबतच उर्फी जावेदने या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिल्याचेही वृत्त आहे. ही बातमी कळल्यानंतर उर्फीचे चाहते खूप आनंदित झाले आहेत आणि मोठ्या पडद्यावर तिचा अभिनय पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
या बातमीनंतर उर्फी जावेद या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. मात्र उर्फी जावेदच्या वतीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.