Close

एकाच वेळी ६ दिग्दर्शकांच्या ६ ‘लव्ह स्टोरींया’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार करण जोहर! (Valentine’s Special Love Storiyaan)

फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू झाला की, व्हॅलेंटाइन वीक सुरू होतो. प्रेमाचा महिना मानला जाणाऱ्या या काळात अनेक वेगवेगळे चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या कथा विशेषतः प्रेमकथा असतात. आता करण जोहर देखील चाहत्यांना असंच एक खास गिफ्ट देणार आहे. या व्हॅलेंटाइन आठवड्यात करण जोहर एक-दोन नव्हे तर, ६ प्रेमकथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या कथा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहेत.

करण जोहर 'व्हॅलेंटाइन वीक'मध्ये चाहत्यांसाठी नवीन सीरिज घेऊन आला आहे. 'लव्ह स्टोरीयां' नावाच्या या सीरिजमध्ये ६ धमाकेदार प्रेमकथा दाखवल्या जाणार आहेत. या सीरिजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सगळ्या प्रेमकथा खऱ्या असणार आहेत. करण जोहरने नुकतीच इंस्टाग्रामवर या नव्या सीरिजची घोषणा केली. करण जोहरची ही नवी सीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या 'लव्ह स्टोरीयां' या चित्रपटात सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या सहा वेगवेगळ्या कथा दाखवण्यात येणार आहेत. अक्षय इंदिकर, अर्चना, कॉलिन डिकुन्हा, हार्दिक मेहता, शाझिया इक्बाल आणि विवेक सोनी या दिग्दर्शकांच्या कथा या चित्रपटात असणार आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा हे आहेत. या 'लव्ह स्टोरी' खऱ्या आयुष्याशी संबंधित असणार आहेत.

‘लव्ह स्टोरींया’ या सीरिजबद्दल सांगताना करण जोहरने लिहिले की, 'खऱ्या प्रेमाच्या खऱ्या कथा... देशभरातून... लवकरच या व्हॅलेंटाइनला तुमच्या भेटीला येत आहे. १४ फेब्रुवारीपासून ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर लव्ह स्टोरींया...’ आपल्या या नव्या सीरिजबद्दल बोलताना करण जोहर म्हणाला की, आमच्यासाठी या प्रेमकथा केवळ सीरिज नसून, त्या प्रेक्षकांना आणि आम्हाला अनुभवायच्या आहेत. या लव्ह स्टोरी सीरिजमधून प्रत्येक प्रकारचे कनेक्शन पडद्यावर दाखवले जाणार आहे.

करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी प्रमुख भूमिका साकारली. तसेच त्याचा कॉफी विथ करण हा शो देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता करणच्या 'लव्ह स्टोरीयां' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/