ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे निधन झाले आहे. शनिवारी त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
देव कोहली यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र ही निधनाची बातमी समोर येताच सिनेइंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे कुटुंब व मित्र परिवार त्यांच्या असा अचानक निघून जाण्याने शोक व्यक्त करत आहेत.
आज दुपारी २ वाजता लोखंडवाला येथील राहत्या घरी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यात येईल. त्यानंतर जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
मैने प्यार किया, बाजीगर, जुडवा २, मुसाफिर, शूटआउट अॅट लोखंडवाला, टॅक्सी नंबर ९११ यांसारख्या १०० हून अधिक हिट चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली होते. आते जाते जल्दी गेट, ये काली काली आंखे, साकी साकी अशी अनेक सुपरहिट गाणीही त्यांनीच लिहिली होती.